Ranveer Singh याच्या अडचणीत मोठी वाढ; कोरोना महामारीनंतर अभिनेत्याचे वाईट दिवस सुरु?

| Updated on: Apr 16, 2023 | 4:08 PM

कोरोना महामारीनंतर 'या' कारणामुळे रणवीर सिंग याच्या अडचणीत मोठी वाढ; बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तीने देखील सोडली अभिनेत्याची साथ... , सर्वत्र अभिनेत्याचीच चर्चा...

Ranveer Singh याच्या अडचणीत मोठी वाढ; कोरोना महामारीनंतर अभिनेत्याचे वाईट दिवस सुरु?
Follow us on

मुंबई : ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गली बॉय’ आणि ‘गोलियो की रासलीलाः रामलीला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनेता कायम त्यच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून एकापेक्षा एक सिनेमात झळकणाऱ्या रणवीर याचे सिनेमे आता बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहेत. कोरोना महामारीनंतर रणवीरच्या एकाही सिनेमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं नाही. कोरोना महामारीनंतर २०२१ मध्ये क्रिकेटचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता झळकला. ‘ 83’ सिनेमानंतर रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ (2022) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त १६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

रणवीर स्टारर ‘सर्कस’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ३५.६५ रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनातंर अभिनेत्याचे तीन सिनेमे अपयशी ठरले. रणवीर स्टारर प्रत्येक सिनेमाला येणार अपयश पाहाता यश राज फिल्म्स (YRF)ने रणवीरसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश राज फिल्म्समध्ये आदित्य चोप्रा आणि त्याच्या टीमने ‘स्पाय यूनिव्हर्स’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे यश राज फिल्म्स कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाही. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर यश राज फिल्म्सना कोणतीही चूक करायची नाही.

हे सुद्धा वाचा

यश राज फिल्म्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रत्येक सिनेमाचं बजेट खूप मोठे असणार आहे आणि त्यामुळे त्रुटीसाठी जागा असू शकत नाही. म्हणून यश राज फिल्म्स (YRF)ने रणवीरसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.’ यश राज फिल्म्स (YRF)ने घेतलेल्या निर्णयामुळे रणवीरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

रणवीरने यश राज फिल्म्स (YRF)सोबत जवळपास सहा सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘बँड बाजा बारात’, ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’ (२०११), ‘बेफिक्रे’ (२०१६), गुंडे (२०१४), किल दिल (२०१४) आणि जयेशभाई जोरदार यश राज फिल्म्सच्या या सिनेमांमध्ये रणवीरने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं, पण काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.