गौतमी पाटीलपेक्षा कितीतरी सुंदर… मुलीची लावणी पाहून नेटकऱ्यांनीही भूरळ; अस्सल मराठी सौंदर्य म्हणत कौतुक
सोशल मीडियावर एका तरुणीचा लावणीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. तिच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले असून, गौतमी पाटीलला ट्रोल करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या मुलीच्या साधेपणा आणि नृत्यकौशल्याचे कौतुक केले आहे.
लावणी म्हटलं की आता सहसा सर्वांच्याच तोंडात गौतमी पाटीलचं नाव असतं. कारण तिच्याच डान्सचे व्हि़डीओ सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होत असतात. पण आता एका मुलीचा लावीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं तर गौतमीला ट्रोल.
लावणी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय नृत्यप्रकार असून या नृत्यप्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण सध्या तेवढ्या कौशल्याने, सहजतेने आणि त्या सर्व कलागुणांसह लावणी करताना पाहायला मिळत नाही. पण, व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ या गाण्यावर अप्रतिम लावणी करताना दिसत आहे. या लावणीचा व्हिडीओ पाहून सगळेच जण तिचे कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ एका नृत्यालयाच्या कार्यक्रमातला असल्याचे दिसून येते. व्हिडीओमध्ये एक तरुणी एका मोठ्या स्टेजवर अप्रतिम लावणी सादर करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
तिच्या प्रत्येक स्टेपवर प्रेक्षक जल्लोष करताना दिसत आहे. कलासिद्धी नृत्यालय आयोजित ‘कलाश्री’ विविधरंगी नृ्त्यविष्कार कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या मुलीचे कौतुक तर केले पण सोबतच गौतमीलाही ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे ” गौतमीपेक्षा कितीतरी पटीने छान नृत्य केलं” तर, एकाने म्हटलं आहे “खरी लावणी हीच, बाकी मार्केट मध्ये चालू ते सगळं बेकार” असं म्हणत गौतमीच्या लावणी गाण्यावरील स्टेप्सबद्दल आणि तिच्या एकंदरीतच डान्सच्या शैलीबद्दल कमेंट करत ‘खरी लावणी ही असते’ असे म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मुलीच्या साधेपणाचं सोबतच तिच्या सुंदर अशा डान्सस्टेप्स आणि तिच्या दिलखेच पण मोहक हावभावांचेही कौतुक केलं आहे. तसेच अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच yari__dosti_143 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नाद फक्त मराठी भाषेत” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.