सोनाक्षी सिन्हाला मिळालं वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट, जहीर इक्बालने सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली !

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिची दहाड ही वेबसीरिज नुकतीच रीलिज झाली, ज्यामध्ये सोनाक्षीच्या कामाचं खूप कौतुक झालं.

सोनाक्षी सिन्हाला मिळालं वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट, जहीर इक्बालने सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली !
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 6:52 PM

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासाठी (Sonakshi Sinha) आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण ती आज तिचा 36 वा वाढदिवस (birthday) साजरा करत आहे. सोनाक्षीचे फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटी तर तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेतच. पण सगळ्यात विशेष शुभेच्छा तिला मिळाल्या आहेत तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) कडून.. त्याने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा देत तिचा वाढदिवस आणखी स्पेशल बनवला आहे.

सोनाक्षी आणि जहीरच्या रिलेशनशिपबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. आणि आता तर जहीरने सोनाक्षीला सर्वांसमोरच, खुल्लम खुल्ला आय लव्ह यू म्हणत प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर जहीरने सोनाक्षी सोबतचे अनेक रोमँटिक फोटो शेअर केले असून त्याच्या कॅप्शनमध्ये I Love You असेही लिहीले आहे.

आज सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जहीरने त्यांचे अनेक फोटो शेअर करत लिहीले आहे… कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना ! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यावर जहीरने लिहीला आहे – तू नेहमी आनंदी रहावेस.. आय लव्ह यू…

View this post on Instagram

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

सोनाक्षी सिन्हा आणि जहीरच्या या फोटोवर सेलिब्रिटी आणि फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव करत अनेक कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी दोघांना लवकर लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच फॅन्सनी सोनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि जहीरच्या रिलेशनशिप बद्दल चर्चा सुरू होती. अर्पिता खानच्या ईद पार्टीतही दोघे एकत्र दिसले होते. पण तेव्हा त्यांच्यापैकी कुणीच नात्याबद्दल काही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आज अखेर, सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त जहीरने त्याच्या प्रेमाची कबुली देत दोघांच्याही नात्याबद्दल सांगितले आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.