मुंबई | 5 फेब्रुवारी 2024 : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर, अभिनेता शोएब इब्राहिम याचा आहे. व्हिडीओमध्ये शोएब भयानक लूकमध्ये दिसत आहे. ‘झलक दिखला जा’ शोमुळे शोएब इब्राहिम चर्चेत आहे. अभिनेत्याचा डान्स देखील चाहत्यांना आवडत आहे. शोच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेता अधिक मेहनत घेतो. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
व्हिडीओमध्ये अभिनेता फार वेगळा दिसत आहे. कारण त्याने प्रोस्थेटिक्सच्या माध्यमातून वेगळा लूक स्वीकारला होता. एवढंच नाही तर अभिनेत्याला त्याच्या परफॉर्मेंस पूर्णपणे केबलने बांधले होतं. दमदार डान्सा झाल्यानंतर शोएब याला श्वास घ्यालया देखील प्रचंड त्रास होत होता… सध्या सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अभिनेत्याचा परफॉर्मेंस संपताच पूर्ण टीम त्याच्या मदतीसाठी धावत येते. अभिनेत्याची परिस्थिती पाहून शोचे परीक्षण फराह खान, अर्शद वारसी आणि जूही चावला देखील हैराण होतात. अभिनेत्याच्या व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएब याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हिडीओमध्ये शोएब याची मेहनत दिसून येत आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘कंटेम्परेरी आणि बॉलिवूड सोडून दुसऱ्या प्रकारचा देखील डान्स कर..’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘या ऍक्टमध्ये डान्स कुठे आहे.’ व्हिडीओ पाहिल्यानंतर काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली, तर काहींनी मात्र अभिनेत्याला ट्रोल केलं.
शोएब इब्राहिम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘झलक दिखला जा’ शोमुळे चर्चेत आहे. शोएब त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. शोएब कायम पत्नी आणि अभिनेत्री दीपिका कक्कर हिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. शोएब याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.