मी असं कधीच… धर्मेंद्र- शबाना आझमींच्या किसींग सीनबद्दल या अभिनेत्रीने दिली मोठी रिॲक्शन !
रॉक और रानी की प्रेम कहानी चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसींग सीनबाबत ज्येष्ठ अभिनेत्रीने रिॲक्शन दिली आहे.
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) चित्रपट रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अजूनही कमाल दाखवत आहे. 300 कोटींच्या क्लबमध्ये हा चित्रपट समाविष्ट झाला आहे.
या चित्रपटातील एक सीन खूप लोकप्रिय झाला आहे, तो म्हणजे अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसींग सीन. या दोघांनीही चित्रपटात एक बोल्ड किसींग सीन दिला असून तो खूप व्हायरलही झाला आहे. धर्मेंद्र आणि शबाना आझमी दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता यावर आणखी एका अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती म्हणजे झरनी वहाब यांची.
एका रिपोर्टनुसार, झरीना वहाब म्हणाल्या की, आम्ही अभिनेते आहोत आणि स्क्रिप्टनुसार एखाद्या गोष्टीची मागणी असेल तर ते करण्यात काही अडचण येऊ नये. वयाबद्दल बोलायचं झालं तर तो फक्त एक आकडा आहे, असं माझं नेहमीच मत असतं. वयात काय आहे ? त्यावर हल्ला करून किंवा चर्चा करून तो मुद्दा मोठा बनवायची काहीच गरज नाही. जेव्हा तरूण अभिनेते असं (किसींग सीन) करतात, तेव्हा ते योग्य मानलं जातं. पण ज्येष्ठ अभिनेत्यांनी ते केल्यावर त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, हे मला थोडा मजेशीर वाटतं, असं त्या म्हणाल्या.
काही वेगळं नाही
झरीना यांनी स्वतः हा चित्रपट पाहिला असून कलाकारांनी तो उत्तम प्रकारे साकारला असल्याचे त्या म्हणाल्या. यात (किसींग सीनमध्ये) काही विचित्र नाही, उलट मला ते (दोघं) खूप क्युच वाटले. शबानाजी आणि धरमजी दोघेही खूप ज्येष्ठ कलाकार आहेत आणि दोघेही परिपक्व आहेत. चित्रपटासाठी काय आवश्यक आहे आणि काय नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. जर त्यांनी किसिंग सीन करण्यास होकार दिला असेल तर मला खात्री आहे की तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असेल आणि तो स्क्रीनवर दिसून आलं, असंही त्या म्हणाल्या.
मी असा सीन करणार नाही तुम्ही ऑनस्क्रीन किसींग कराल का, असा प्रश्नही झरीना यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या , मी नाही करणार. मी तरूण असताना कधी केलं नाही, तर आता म्हातारपणी काय करणार ? एखाद्या व्यक्तीला स्क्रीनवर बघणं वेगळं आणि स्वत: ते करणं यामध्ये खूप फरक असतो. पण तो किसींग सीन पाहताना मला काहीच प्रॉब्लेम वाटला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.