Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zee Marathi Awards | ‘माझा होशील ना’ अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान

'माझा होशील ना' या मालिकेने 'झी मराठी अवॉर्ड्स 2020-21'मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले. (Zee Marathi Awards winners list)

Zee Marathi Awards | 'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 9:46 AM

मुंबई : ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’ मध्ये (Zee Marathi Awards 2020-21) ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका ठरली. सईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री गौतमी देशपांडेला सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार मिळाला, तर ओमच्या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता शल्व किंजवडेकर सर्वोत्कृष्ट नायक ठरला. ‘माझा होशील ना’मधील सई-आदित्य ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली. ‘माझा होशील ना’ या मालिकेने ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’मध्ये सर्वाधिक पुरस्कार पटकावले. ‘झी मराठी अवॉर्ड्स 2020-21’च्या उत्तरार्धाचे रविवारी प्रक्षेपण झाले. (Zee Marathi Awards 2020-21 Part 2 full winners list)

‘देवमाणूस’ मालिकेतील डॉ. अजितकुमार देव या भूमिकेसाठी किरण गायकवाडला खलनायकासोबतच सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेचाही पुरस्कार मिळाला. तर ग्रामीण म्हणींनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या सरु आजीला सर्वोत्कृष्ट स्त्री व्यक्तिरेखेचा मान मिळाला. सरु आजीला सर्वोत्कृष्ट स्त्री विनोदी व्यक्तिरेखेचाही पुरस्कार मिळाला होता.

मुख्य पुरस्कारांमध्ये ‘माझा होशील ना’ सर्वोत्कृष्ट ठरली. ‘माझा होशील ना’ ही सर्वोत्कृष्ट मालिका, ब्रह्मे हे सर्वोत्कृष्ट कुटुंब, सई सर्वोत्कृष्ट नायिका, तर सई-आदित्य ही सर्वोत्कृष्ट जोडी ठरली. तर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ओमला सर्वोत्कृष्ट नायक हा किताब मिळाला.

झी मराठी अवॉर्ड्स 2020-21 पूर्वार्ध – पुरस्कारांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट मालिका –  माझा होशील ना सर्वोत्कृष्ट कुटुंब – ब्रह्मे कुटुंब (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट जोडी – सई आदित्य (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट नायिका – सई (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट नायक – ओम (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट खलनायिका – मालवीका (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट खलनायक – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट आई – शकू (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट बाबा – दादा साळवी (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट सासू – आसावरी (अग्गंबाई सासूबाई) सर्वोत्कृष्ट सासरे – ब्रह्मे मामा (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट सून – शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई) सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) – सुमन काकी (येऊ कशी तशी मी नांदायला) सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – शशिकांत बिराजदार (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – टोण्या (देवमाणूस) सर्वोत्कृष्ट भावंडं – ब्रह्मे मामा (माझा होशील ना) सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अशोक पत्की (माझा होशील ना)

(Zee Marathi Awards 2020-21 Part 2 full winners list)

एकूण पुरस्कार – 20

माझा होशील ना – 08 येऊ कशी तशी मी नांदायला – 05 देवमाणूस – 05 अग्गंबाई सासूबाई – 02

विशेष पुरस्कार

जीवनगौरव पुरस्कार : आप्पा (अभिनेते अच्युत पोतदार) (माझा होशील ना) लक्षवेधी चेहरा : मानसी (पाहिले ना मी तुला) विशेष सन्मान (मालिका) : माझ्या नवऱ्याची बायको विशेष सन्मान (दिग्दर्शना) : राजू सावंत (रात्रीस खेळ चाले, देवमाणूस) सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स : रेवती बोरकर (काय घडलं त्या रात्री) प्रभावशाली व्यक्तिरेखा : समरप्रताप जहागीरदार (पाहिले ना मी तुला) गोल्डन ब्यूटी : स्वीटू (येऊ कशी तशी मी नांदायला)

संबंधित बातम्या :

Zee Marathi Awards | स्वीटू-शकू-आसावरीला पुरस्कार, ‘देवमाणूस’ बेस्ट खलनायक, झी मराठी अवॉर्ड विजेत्यांची यादी

(Zee Marathi Awards 2020-21 Part 2 full winners list)

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.