मुंबई : कोरोना संकटामुळे 2020मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम हा संपूर्ण हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीवर पडला. मात्र आता योग्य ती सावधगिरी बाळगून कोरोनाच्या नियमांचं पालन करत मालिका आणि सिनेमांच्या चित्रीकरणाचं काम सुरू झालं आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.
अशात आता मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनं कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे. झी स्टुडिओजचा पांडू हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे, लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणारं आहे. या चित्रपटाला निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांच्या ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
#पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला.@zeestudiosने पांडू चित्रपटाची annoucement करणं हे निर्माते,प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे! या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसनी पुन्हा थिएटरकडे पाऊले वळवली आहेत ही खूप positive गोष्ट वाटते! आपली इंडस्ट्री 2021 गाजवायला सज्ज आहे! pic.twitter.com/asivS6GWPM
— दिपक राणे – Deepak Rane (@Deerane) January 25, 2021
निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झी स्टुडीओजनं पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसने पुन्हा थिएटरकडे पाऊलं वळवली आहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट आहे. आपली इंडस्ट्री 2021 गाजवायला सज्ज आहे.”
सर्वांनाच आशा आहे ती सिनेमांच्या हाऊसफुल्ल पाट्यांची. आता पांडू हा सिनेमा नवीन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं यात शंका नाही.
संबंधित बातम्या
Major : 26/11 चे हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना महेश बाबूंचा सलाम, ‘मेजर’ चित्रपटाची तारीख जाहीर