Diwali 2023 : धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांचे आहे वेगवेगळे महत्त्व, रंजक आहे पौराणिक कथा

Diwali 2023 भारतीय काळाची गणना सतयुगापासून सुरू होते असे म्हणतात. या काळात पहिल्यांदाच दिवाळी सण साजरा करण्यात आला. यानंतर त्रेता आणि द्वापर युगात राम आणि कृष्णाबरोबरच त्यात नवीन घटनांची भर पडली आणि तो पाच दिवसांचा उत्सव बनला. सध्या देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. दिवाळी हा आनंद साजरा करण्याचा आणि वाटून घेण्याचा सण आहे.

Diwali 2023 : धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांचे आहे वेगवेगळे महत्त्व, रंजक आहे पौराणिक कथा
दिवाळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 1:34 PM

मुंबई : उद्या धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरूवात होणार आहे.  दिवाळीचा (Diwali 2023) सण 5 दिवस चालतो, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेच्या दिवशी संपतो. भारतीय काळाची गणना सतयुगापासून सुरू होते असे म्हणतात. या काळात पहिल्यांदाच दिवाळी सण साजरा करण्यात आला. यानंतर त्रेता आणि द्वापर युगात राम आणि कृष्णाबरोबरच त्यात नवीन घटनांची भर पडली आणि तो पाच दिवसांचा उत्सव बनला. सध्या देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. दिवाळी हा आनंद साजरा करण्याचा आणि वाटून घेण्याचा सण आहे. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आणि ओळख आहे. हा पाच दिवस चालणारा उत्सव देवी लक्ष्मी, भगवान राम आणि कृष्णाच्या पूजेला समर्पित आहे.

पाच दिवसांचे महत्त्व?

पाच दिवसांच्या या सणात दिवाळी सर्वात खास आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवसापासून खरेदी सुरू होते आणि हा सण यम द्वितीयेला संपतो. या पाच दिवसांमध्ये सर्वत्र भक्ती आणि आनंदाचे वातावरण असते. आणि त्याची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. धनत्रयोदशी ते भाईदूज या पाच दिवसांच्या उत्सवाची तारीख आणि या सर्व दिवसांचे महत्त्व जाणून घेऊया.

पहिला दिवस

सर्वप्रथम, सतयुगात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले. तेव्हापासून धनत्रयोदशीचा सण सुरू झाला. धनत्रयोदशीला अमृतपत्राचे स्मरण करून नवीन भांडी व नवीन वस्तू घरी आणण्याची परंपरा आहे. या दिवशी दिवे दान केल्याने यमराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशीही श्रद्धा आहे. यावर्षी हा सण 10 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरा दिवस

द्वापार यगुमध्ये या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी पाच-सात दिवे लावण्याचीही परंपरा आहे. यावेळी हा सण 11 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

तिसरा दिवस

सतयुगात, देवी लक्ष्मी प्रथम कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्रमंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा आहे. तेव्हापासून दिवाळी साजरी करणे सुरू झाले. पुढे त्रेतायुगातील या दिवशी राम वनवासातून घरी परतले. हा दिवस महालक्ष्मीच्या पूजेसाठी खास आहे. यावर्षी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.

चौथा दिवस

द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला गोवर्धन पर्वताची पूजा करत असत. तेव्हापासून हा दिवस या पाच दिवसांच्या उत्सवाचा एक भाग बनला. या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून देवाला दूध, दही, तूप अर्पण केले जाते. तसेच, विकास आणि वाढीसाठी दिवे लावले जातात. यावर्षी हा उत्सव 13 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

पाचवा दिवस

द्वापार युगात या दिवशी नरकासुराचा पराभव करून कृष्ण आपली बहीण सुभद्राला भेटायला गेला होता. तर सत्ययुगात याच दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी तिच्या आमंत्रणावर गेले आणि यमुना त्यांना औक्षवण करून त्यांचा सन्मान केला होता. तेव्हापासून हा दिवस बाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाऊ-बहिणीतील प्रेमाचे बंध दृढ करण्याचा दिवस आहे. यंदा 14 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.