पाचव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करायचे आहे, शुभ मुहूर्तापासून सर्व विधी जाणून घ्या

गणपती बाप्पाच्या आगमनामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आहे. कालच दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन झाले होते. आता पाच दिवस, सात आणि दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे.

पाचव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करायचे आहे, शुभ मुहूर्तापासून सर्व विधी जाणून घ्या
Ganesh Chaturthi Visarjan 2024:
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 8:46 PM

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात होत असते, या उत्सव दहा दिवसांपर्यंत चालत असतो. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना झाली की दहा दिवस दुपारी आणि रात्री आरत्यांचा सर्वत्र जयघोष सुरु होतो. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो. यंदा अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर रोजी आहे. परंतू मुंबईच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण गणपती बाप्पाला दीड दीवसात निरोप देतात. काल म्हणजे 8 सप्टेंबर रोजी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन झाले. आता पाचव्या, सातव्या दिवसाचे विसर्जन देखील होणार आहे. त्यानंतर दहाव्या दिवशी अंनत चतुर्दशीला विसर्जन होते.

गणेश विसर्जन तिथी मुहूर्त ( Ganesha Visarjan Shubh Muhurat )

हिंदू वैदिक पंचांगानूसार गणेशोत्सवाचा 5 वा दिवस बुधवार 11 सप्टेंबर रोजी आहे. ज्यांना भक्तांना 5 व्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करायचे आहे त्यांच्यासाठी शुभ मुहू्र्त सकाळी 10.45 पासून दुपारी 12.18 पर्यंत आहे.

विसर्जनाचा विधी (Ganesha Visarjan Vidhi)

गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाठ तयार करावा. त्यानंतर त्यावर स्वस्तिक तयार करावे. त्यानंतर गंगाजल टाकावे, त्यावर पिवळ्या रंगाचे कापड अंथरावे. बाप्पाच्या मूर्तीला नवीन वस्र घालून कुंकूवाचे तिलक लावून गणरायाची पूजा करावी.आसनावर अक्षता टाकावे, गणेशाची मूर्तीवर फुल, फळ आणि मोदक आदी नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा, बाप्पाची मूर्तीचे विसर्जन करण्याआधी त्यांची विधिवत पूजा करावी. आणि बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करावी.त्यानंतर संपूर्ण परिवाराने बाप्पाची आरती करावी. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विविवध विसर्जन करावे, त्यानंतर बाप्पाला आपले काही चुकले असेल तर माफी मागावी आणि पुन्हा बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची साध घालावी.

विसर्जन करताना या गोष्टीची काळजी घ्या

गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करताना काही गोष्टीची खास काळजी घ्यायला हवी. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नये. विसर्जनाआधी बाप्पााच्या पूजेसाठी तुलसी किंवा बेल पत्राचा उपयोग करु नये. गणेशाचे आशीवार्द मिळण्यासाठी 21 दुर्वांची जुडी वाहावी.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.