MAKAR SANKRAT : पुढील 56 वर्षे मकर संक्रांती 15 जानेवारीलाच, 2080 साली बदलणार तारीख
आता मकर संक्रांती 15 जानेवारी 2080 पर्यंत म्हणजेच पुढील 56 वर्षे साजरी केली जाईल. यानंतर मकर संक्रांत आणखी एक दिवस पुढे जाईल. म्हणजेच 56 वर्षांनंतर सूर्याचे मकर राशीत संक्रमण 16 जानेवारीला होईल.
नवी दिल्ली | 16 जानेवारी 2024 : यंदाची मकर संक्रात ही 15 जानेवारीला साजरी करण्यात आली. ग्रहांचा राजा सूर्य याने 15 जानेवारी रोजी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केला. 2008 ते 2017 पर्यंत सूर्याचे राशी परिवर्तन 14 जानेवारीच्या संध्याकाळी होत होते. त्यामुळे मकर संक्रांत 14 जानेवारीला वैध होती. यानंतर, सूर्याचे राशी परिवर्तन सहा वर्षे अनिश्चित होते. त्यामुळे संक्रांती कधी 14 तारखेला तर कधी 15 जानेवारीला साजरी करण्यात येत होती, पण, आता तसे काही होणार नाही. पुढील ५६ वर्ष मकर संक्रात ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येईल.
ज्योतिषीय गणनेनुसार, आता मकर संक्रांती 15 जानेवारी 2080 पर्यंत म्हणजेच पुढील 56 वर्षे साजरी केली जाईल. यानंतर मकर संक्रांत आणखी एक दिवस पुढे जाईल. म्हणजेच 56 वर्षांनंतर सूर्याचे मकर राशीत संक्रमण 16 जानेवारीला होईल. यंदा सूर्याचे राशी परिवर्तन सकाळी 9.13 वाजता झाले.
सूर्याचे राशी परिवर्तन पुढील 56 वर्षे म्हणजे 2080 पर्यंत फक्त सकाळीच होईल. 1936 पासून मकर संक्रांती 14 जानेवारीला साजरी केली जात होती. 1864 ते 1936 या काळात 13 जानेवारी आणि 1792 ते 1864 या काळात 12 जानेवारीला मकर संक्रात साजरी करण्यात आली होती याकडे ज्योतिष पंडितांनी लक्ष वेधले.
संक्रांत दर तीन वर्षांनी एक तास पुढे सरकते
दरवर्षी सूर्याच्या राशी बदलात 20 मिनिटांचा विलंब होतो. अशा प्रकारे तीन वर्षांत हा फरक एक तासाचा होतो. 72 वर्षात 24 तासांचा फरक आहे. सूर्य आणि चंद्र हे थेट ग्रह आहेत. ते मागे सरकत नाहीत. त्यामुळे एक दिवस जोडला जातो. 2008 मध्ये 72 वर्षे पूर्ण झाली. आहेत. त्यामुळे आत पुढील 56 वर्ष मकर संक्रात 15 जानेवारीला साजरी करण्यात येईल.