प्यार दो…प्यार लो… म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उधळले रंग, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छा काय ?

| Updated on: Mar 07, 2023 | 1:22 PM

संपूर्ण राज्यात आज धूळवड साजरी केली जात आहे. त्यामध्ये ठाण्यात धुळवडीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खास शुभेच्छा दिल्या आहे.

प्यार दो...प्यार लो... म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी उधळले रंग, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छा काय ?
Image Credit source: Google
Follow us on

ठाणे : आजचा दिवस सगळं विसरून रंगाची उधळण करायची असते, काल आपण होळीच्या ( Holi Festival ) निमित्ताने द्वेषाचं दहन केलेले आहे, रंग म्हणजे प्रेम आणि प्रेमाचा रंग पसरला पाहिजे. त्यासाठी उत्साहात मुलं रंग खेळत आहे आणि त्यात प्रत्येकाने सामील झाले पाहिजे असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड ( Jitedra Avhad ) यांनी रंगाची उधळण केली आहे. रंगाचा बेरंग करू नका, जे रंग आहे ते तसेच रंग राहुद्या. तुम्ही तुमचे रंग दाखवा आम्ही आमचे रंग दाखवू पन कोणाच्या आयुष्यातील रंग बेरंग करू नका आशा शुभेच्छा जितेंद्र आव्हाड यांनी दिल्या आहे. खरंतर होळीच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत असतांना चिमटा काढला आहे.

माझ्या सारखा छोटा कार्यकर्ता मुख्यमंत्र्यांना काय सांगेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा माणूस आहे म्हणत ठाण्यातील शिवाईनगर येथील राड्यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोलणं टाळलं आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना चिमटा काढण्याची संधी सोडलेली नाही.

होळी ही दुशकृत्यांचे दहन करायचे असते, आणि प्रेमाच्या रंगांची उधळण करायची असते. हा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रभर झाला पाहिजे. बेरंग झालेले आयुष्य रंगतदार झाले पाहिजे अशा शुभेच्छा महाराष्ट्रातील जनतेला आणि माझ्या कार्यकर्त्यांना देतो असे आव्हाड यांनी म्हंटलंय.

हे सुद्धा वाचा

होळीच्या दिवशी कोणाच्याही बाबापाचा घो म्हणत असतो. होळी होळी असते. असं म्हणताच यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने त्याचा धागा पकडून विरोधकांवर फटकेबाजी केली आहे.

होळीचा रंग उधळत असतांना बेभान होऊन जात असतात. द्वेषाने मन दूषित होतात. प्रेम हे अंतिम आहे त्यातून खरा आनंद मिळतो, म्हणून प्यार दो प्यार लो म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी होळीच्या शुभेच्छा देत होळीचा आनंद साजरा केला आहे.

संपूर्ण राज्यात होळी साजरी झाल्यानंतर आज धूळवड साजरी केली जात आहे. त्यामध्ये रंगाची उधळण करत असतांना राजकीय फटकेबाजी देखील पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे.

दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशीच संधी जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोडली नाही, त्यामध्ये रंगांचे बेरंग होऊ देऊ नका म्हणून टोला लगावला आहे. याशिवाय प्यार दो प्यार लो म्हणत टोलाही लगावला आहे.