रंगाचा भंग होऊ नये म्हणून अस्थमाच्या रुग्णांनी होळी खेळताना घ्यावी अशी काळजी

होळी खेळताना रंगांमुळे त्रास होऊ नये म्हणून अस्थमाच्या रुग्णांनी सावधानता बाळगत विशेष काळजी घ्यावी.

रंगाचा भंग होऊ नये म्हणून अस्थमाच्या रुग्णांनी होळी खेळताना घ्यावी अशी काळजी
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 7:45 AM

नवी दिल्ली : होळी हा रंगांचा आणि आनंदाचा सण सुरू व्हायला अवघे काही तास उरले आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. काही लोक होळीला एवढी मस्ती करतात की त्यांची तब्येतही बिघडवतात. या यादीत अस्थमाचे (asthma) रुग्ण प्रथम येतात. विशेषतः दम्याच्या रुग्णांनी होळीच्या सणादरम्यान काही गोष्टींची विशेष (health care) काळजी घ्यावी. कारण त्यांचा थोडासा निष्काळजीपणा त्यांना खूप आजारी बनवू शकतो. दम्याच्या रुग्णाच्या तोंडात गुलाल किंवा रंग गेला (holi colors) तर त्यांना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. होळीच्या दिवशी अस्थमाच्या रुग्णासोबत काहीही अनुचित होऊ नव्हे यासाठी काही टिप्स फॉलो कराव्यात.

दम्याच्या रुग्णांनी होळीच्या दिवशी या गोष्टींची काळजी घ्यावी

होळीचे रंग – धूळ आणि माती टाळा

हे सुद्धा वाचा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, होळीच्या दिवशी अस्थमाच्या रुग्णांनी काळजी घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी गुलाल आणि चिखल टाळावा. एवढेच नाही तर त्यांची तब्येत बिघडणार नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संपर्कात राहण्याची गरज नाही. कारण गुलालामुळे त्यांना अस्थमाचा ॲटॅकही येऊ शकतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी पाण्यानेच होळी खेळावी.

होळी खेळाताना इनहेलर खिशात ठेवा

जर दम्याचे रुग्ण होळी खेळण्याचा विचार करत असतील तर तुमच्यासोबत इनहेलर नेहमी ठेवा. कारण रंग आणि गुलालामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. इनहेलर असल्यास, तुम्ही दम्याचा त्रास ताबडतोब नियंत्रित करू शकता.

अस्थमाच्या रुग्णांना होऊ शकतो हा त्रास

होळीदरम्यान कोरड्या रंगाने खेळल्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. कारण रंगात असलेले छोटे कण श्वासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात. आणि नंतर पुढे समस्या निर्माण करतात.

गुलाल हा केमिकलने बनलेला असतो, त्यामुळे श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णाला या समस्या येतात

कोरड्या रंगाला गुलाल म्हणतात. आजकाल गुलाल हे केमिकलपासून ते हर्बल गोष्टींपर्यंत बनवले जातात. गुलालाशिवाय होळी खेळण्यात मजा नाही. पण काळानुरूप त्यात बदल झाले आणि होळीचे हे रंग आता रासायनिक बनले आहेत आणि ते काही मजबूत रासायनिक पदार्थांपासून तयार केले जातात. ते आरारूटमध्ये मिसळून, चमकदार रंगांचे गुलाल तयार केले जातात. हे रासायनिक रंग आपल्या शरीरासाठी विशेषतः डोळे आणि त्वचेसाठी हानिकारक असतात. पण तरीही काही हर्बल गुलालही बाजारात उपलब्ध आहेत, जे लावल्याने काही त्रास अथवा दु्ष्परिणाम होत नाहीत. अशा रंगाचा वापर तुम्ही करू शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.