Pola Date 2023 : यंदा किती तारखेला साजरा होणार बैल पोळा? या सणाला हे नाव कसे कसे पडले?
भारत, जिथे शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे आणि बहुतेक शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. त्यामुळे प्राण्यांची पूजा आणि आभार मानण्यासाठी शेतकरी हा सण साजरा करतात.
मुंबई : भारत हा कृषिप्रधान देश आहे, इथे बैलांचे शेती उत्तम करण्यात विशेष योगदान आहे. त्यामुळे भारतात बैलांचे पूजा केली जाते. पोळा (Pola 2023) हा सण अशा दिवसांपैकी एक आहे ज्या दिवशी शेतकरी गायी आणि बैलांची पूजा करतात. पोळा हा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो, याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. तो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो. यंदा पोळा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आपल्याकडे हा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. बैल पोळ्याला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो.
या सणाला पोळा हे नाव कसे पडले?
भगवान विष्णू कान्हाच्या रूपात पृथ्वीवर आले तेव्हा ती कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. त्याचा मामा कंस जन्मापासूनच त्याचा शत्रू होता. कृष्ण तरुण असताना वसुदेव-यशोदेच्या घरी राहत होता तेव्हा कंसाने त्याला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले होते. एकदा कंसाने पोलासुर नावाच्या राक्षसाला पाठवले होते, त्याच्या लीलेमुळे त्यालाही कृष्णाने मारले होते, आणि सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तो दिवस श्रावण महिन्यातील अमावास्येचा दिवस होता, या दिवसापासून त्याला पोळा असे नाव पडले.
असे आहे या सणाचे महत्त्व
भारत, जिथे शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे आणि बहुतेक शेतकरी शेतीसाठी बैलांचा वापर करतात. त्यामुळे प्राण्यांची पूजा आणि आभार मानण्यासाठी शेतकरी हा सण साजरा करतात. पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुलं खेळण्यातील बैल शेजारच्या घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जातात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)