Holi Special : कपड्यांवरील होळीचे रंग घालवण्यासाठी करा हे उपाय

होळी खेळताना रंग कपड्यांवर लागल्यावर तर तो काढणे सर्वात कठीण असते, म्हणून काही जण जुने कपडे वापरणं पसंत करतात. मात्र काही टिप्सचा वापर करून कपड्यांवरील रंगाचे डाग तुम्ही घालवू शकाल.

Holi Special : कपड्यांवरील होळीचे रंग घालवण्यासाठी करा हे उपाय
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 8:21 AM

नवी दिल्ली : होळीच्या दिवशी आपण केसांना आणि शरीराला तेल (oil on hair and skin) लावतो, जेणेकरून रंग काढणे सोपे जाते. पण कपड्यांवर (color on clothes) लागलेले रंग काढणे हे मोठे काम होते. काही रंग तर सहज निघतात पण काही रंग खूप हट्टी असतात आणि तुमचे कपडे खराब करतात. त्यामुळे हे कपडे फेकून द्यावे लागतात किंवा पुढच्या होळीला घालण्यासाठी बाजूला ठेवावे लागतात. पण बाहेरच्या किंवा ऑफिसच्या कपड्यांवर रंग लागला असेल तर काय कराल? कपड्यावरील रंग घालवण्याकरता पाठ दुखेपर्यंत मेहनत करावी लागते. मात्र या कठोर पद्धतींचा अवलंब न करता कपड्यांवरील रंगाचे डाग कसे काढायचे (how to remove colors from clothes) याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे नक्की वाचा.

येथे दिलेले काही उपाय वापरून तुम्ही कपड्यांवरील जिद्दी रंग हटवू शकता.

पांढरे व्हिनेगर वापरून पहा

हे सुद्धा वाचा

पांढरे व्हिनेगर एक उत्कृष्ट आणि प्रभावी स्वच्छता एजंट आहे. याच्या मदतीने तुम्ही कपड्यांवर होळीचा रंग सहज साफ करू शकता. अर्ध्या बादली पाण्यात कपडे धुण्याचे डिटर्जंट मिसळा आणि त्यात 1 कप व्हिनेगर मिसळा. त्यात कपडे घाला आणि 20-25 मिनिटे थांबा. व्हिनेगरमधील आम्ल रंग काढून टाकण्यास मदत करेल.

विंडो क्लीनरने करा साफ

हो, तुमचा विंडो क्लीनर देखील कपड्यांवरील डाग काढून टाकू शकतो. फक्त तुम्ही क्लिअर अमोनिया- बेस्ड स्प्रे वापरत असल्याची खात्री करून घ्या. हा स्प्रे तुमच्या कपड्यांवर जेथे रंगाचे डाग लागलेले असतील तेथे फवारा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. यानंतर आपले कपडे सामान्य पद्धतीने धुवा. जर डाग जास्त असेल तर ही प्रक्रिया दररोज करावी.

ब्लीचने करा साफ

जर तुमच्या पांढऱ्या कपड्यांवर रंग लागला असेल तर त्यातील रंग काढणे थोडे कठीण आहे. पांढरे कपडे खूप लवकर रंग शोषून घेतात. जर तुम्हाला पांढऱ्या कपड्यांवरून रंग काढायचा असेल, तर अर्धा कप कोमट पाण्यात नॉन-क्लोरीन ब्लीच घाला आणि मग त्यात तुमचे पांढरे कपडे घाला. काही वेळ भिजवून ठेवल्यानंतर ते साधारणपणे धुवा आणि कोरडे करा. पांढऱ्या कपड्यांवरील रंग कमी होईल

लिंबाच्या रसाने स्वच्छ करा

लिंबाचा अम्लीय गुणधर्म डाग काढून टाकण्यास मदत करतो. एका भांड्यात डिटर्जंट आणि लिंबाचा रस (लिंबाचा रस कसा साठवायचा) घालून घट्ट पेस्ट बनवा आणि नंतर डागांवर लावा आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा. 15 मिनिटांनंतर, हलक्या हातांनी स्क्रब करा आणि सामान्य पद्धतीने धुवा.

या गोष्टींचीही घ्या काळजी –

– रंग लागलेले किंवा डाग लागलेले कपडे शक्य तितक्या लवकर धुवा. रंग जितका जास्त काळ टिकेल तितके तो काढणे अधिक कठीण होईल. जे कपडे धुता येत नाहीत ते लवकरात लवकर ड्राय क्लीनरकडे घ्या.

– डाग लागलेले आणि स्वच्छ कपडे एकत्र धुवू नका. तसेच डाग काढण्याची दोन उत्पादने कधीही एकत्र मिसळू नका. काही डाग हट्टी असतात आणि ते काढण्यासाठी एका वेळेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतात.

– तुम्ही ज्या कपड्यांमध्ये केमिकल उत्पादने वापरली आहेत ते चांगले धुवा जेणेकरून त्यात केमिकलचा कोणताही ट्रेस राहणार नाही.

– रंगीत कपड्यांवर क्लोरीन ब्लीच वापरू नका कारण त्यामुळे फॅब्रिकचे रंग खराब होतील.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.