Hug Day Wishes 2024 : कोणी याला म्हणतात जादूची झप्पी तर, कोणी याला म्हणतात प्रेम.., आज ‘हग डे’ निमित्त पाठवा शुभेच्छा संदेश
Hug Day 2024 Date 'आज वैलेंटाईन वीक'चा सहावा दिवस आहे. हा दिवस हग डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारून त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. तुमच्या प्रिय व्यक्तीला हग डे निमित्त शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस साजरा करा.
मुंबई : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे. या प्रेम सप्ताहाचा सहावा दिवस प्रेमी युगुलांसाठी खूप खास आहे. या दिवशी लोक हग डे साजरा करतात. 12 फेब्रुवारी हा दिवस जगभरात हग डे म्हणून साजरा केला जातो. आम्ही तुमच्यासाठी काही प्रेमाने भरलेले मेसेज घेऊन आलो आहोत, हा दिवस साजरा करण्यासाठी हे मेसेज तुमच्या प्रियजनांना लगेच पाठवा.
‘हग डे’ निमित्त पाठवा तुमच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा
- एकदा मला उराशी कवटाळून घे, आपलं स्वप्नही डोळ्यांत सजवून घे, कधीपासून आहे तडफड तुला आपलं बनवण्याची, संधी आहे सख्या/सखे तर मला कायमचं तुझं होऊ दे..
- तुझ्या मिठीत सख्या रे, घडीलाही वेळ कळेना, काट्यांवरती चढले काटे, मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे..
- प्रेम माझं तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावणार नाही, तुला मिठीत घेताच कळतं, आता त्याचीही गरज भासणार नाही..
- स्पर्श प्रेमाचा, हवाहवा वाटतो, मिठीतला क्षण हरघडी नवाच भासतो..
- बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं, एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं..
- प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही, तुला मिठीत घेताच कळत, आता त्याचीही गरज भासणार नाही.
- बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं, एका जन्माचे आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं. Happy Hug Day
- मिठीत तुझ्या असताना वेळेनेही थोडं थांबावं, क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं ! Happy Hug Day
- चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं तुला भेटल्यावर, तुलाच पाहत राहावंसं वाटतं, ….. तुझ्या कुशीत मिटल्यावर Happy Hug Day!
- प्रेम माझं तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावणार नाही, तुला मिठीत घेताच कळतं, आता त्याचीही गरज भासणार नाही…Happy Hug Day
- बोलू मूकपणाने होकार ओठ देती, नाती तनामनांची ही एकरूप होती एकांत नाचतो हा फुलवूनिया पिसारा, ओल्या मिठीत आहे हा रेशमी किनारा ‘हग डे’च्या शुभेच्छा
- काही वेळेला आपल्याला गरज असते ती फक्त आपल्या जवळच्या माणसाकडून एका घट्ट मिठीची….Happy Hug Day!
- असं म्हणतात 120 सेकंद मिठी मारल्यावर एकमेकांवरील विश्वास वाढतो…. मग आपल्यातील विश्वास कधी वाढणार? हॅपी हग डे !
- नाही कळायची ती ओढ आपूलकीची प्रेमाची …. मायेची.. ममतेची..मिठीतल्या श्वासांची..हॅप्पी हग डे
- कधीकधी फक्त उबदार मिठी हजारो शब्द बोलते जे भाषा स्पष्ट करू शकत नाही. मिठी दिनाच्या शुभेच्छा
- मला फक्त तुला घट्ट मिठी मारायची आहे आणि तुला माझ्याजवळ ठेवायचे आहे मिठी दिनाच्या शुभेच्छाHappy Hug Day
- कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर, आयुष्य तिथंच थांबत तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर, Happy Hug Day-
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)