Ganesh Visarjan 2024 : गणपती बाप्पाच्या 5 व्या आणि 7 व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय ?
दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन नुकतेच झाले. आता 5 व्या, 7 व्या दिवसाचे आणि अनंत चतुर्दशी होणारे 10 दिवसाचे गणेशाचे विसर्जन होणार आहे. शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाला निरोप दिला तर सुख-समृद्धी कायम राहते असे म्हणतात.
Ganesh Visarjan 2024: 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बाप्पा घरोघरी वाजत गाजत आले देशभर गणेशाच्या उत्सवाचा सोहळा सुरु झाला. अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. परंतू घरगुती गणपतीचे विसर्जन दीड दिवस, पाच आणि सात दिवसात देखील केले जाते. आता पंचागानूसार 5व्या,7 व्या दिवसाच्या विसर्जनाचा मुहूर्त काय हे आपण पाहूयात..कारण ज्याप्रकारे गणपतीची प्रतिष्ठापना मुहूर्तावर होते तसे त्याचे विसर्जन देखील शुभ मुहूर्तावर केले जाते. यामुळे बाप्पााच्या पूजेचे संपूर्ण फळ मिळत असते आणि शुभ कार्य संपन्न होते.
5 व्या दिवसाचा गणेश विसर्जनाचा मुहूर्त 2024
प्रातः मुहूर्त (शुभ) – सकाळी 10:44 वा. – दुपारी 12:17 वा.
अपराह्न मुहूर्त (चर, लाभ) – दुपारी 03:24 वा. – सायंकाळी 06:31 वा.
सायाह्न मुहूर्त (शुभ, अमृत, चर ) – रात्री 07:57 – प्रात: 00:18, दि. 12 सप्टेंबर
उषाकाल मुहूर्त (लाभ) – सकाळी 03:11 – सकाळी 04:38, दि.12 सप्टेंबर
7 व्या दिवसाचा गणेश विसर्जनाचा मुहूर्त 2024
प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी 06:05 – सकाळी 10:44 वा.
अपराह्न मुहूर्त ( चर ) – सायंकाळी 04:55 – सायंकाळी 06:28 वा.
अपराह्न मुहूर्त ( शुभ ) – दुपारी 12:17 – दुपारी 01:50 वा.
रात्रि मुहूर्त (लाभ ) – रात्री 09:23 – रात्री 10:50 वा.
रात्रि मुहूर्त ( शुभ, अमृत, चर ) – प्रात: 12:17 – सकाळी 04:38, दि. 14 सप्टेंबर
अनंत चतुर्दशी पर गणेश विसर्जन मुहूर्त
प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) – सकाळी 09:11 वा. – दुपारी 01:47 वा.
अपराह्न मुहूर्त (शुभ) -दुपारी 03:19 वा. – सायंकाळी 04:51 वा.
सायाह्न मुहूर्त (लाभ) – रात्री 07:51 वा.- रात्री 09:19 वा.
रात्रि मुहूर्त (शुभ, अमृत, चर) – रात्री 10:47 वा. – सकाळी 03:12वा., दि. 18 सप्टेंबर
गणेश विसर्जनाचा विधी
गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची पूजा त्यांच्या आवडत्या वस्तूंनी केली जाते. दुर्वा, मोदक, लाडू, सिंधूर, कुमकुम, अक्षत, पान, सुपारी, लवंग, इलायची, हळद, नारळ, फूल, अत्तर, फळे अपर्ण करावीत. पूजेचा विधी करताना ॐ श्री विघ्नराजाय नमः। या मंत्राचा जप करावा.
घर किंवा मंडळात जेथे गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. तेथे आरती आणि हवन करावे, आता एका पाटावर गंगाजल शिंपडावे,त्यावर स्वास्तिक चिन्ह तयार करुन लाल कपडा अंथरावा.
गणपती प्रतिमा आणि त्यांना अर्पित करण्याची सर्व सामग्री पाटावर ठेवावी. त्यानंतर ढोल, ताशा आणि वाजंत्री सोबत आपल्या लाडक्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढावी.
त्यानंतर समुद्र,नदी किंवा पालीकेच्या कृत्रिम तलावावर बाप्पाला आणावे, त्यानंतर विसर्जनापूर्वी पुन्हा गणपती बाप्पाची कापूर पेटवून त्याने पुन्हा एकदा आरती करावी.
बाप्पाच्या पूजेत काही चूक वगैरे झाली असेल तर माफी मागावी, त्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी बाप्पाला येण्याची विनंती करावी. ॐ गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ, स्वस्थाने परमेश्वर। यत्र ब्रह्मादयो देवाः, तत्र गच्छ हुताशन या मंत्राचा जप करीत बाप्पाच्या मूर्तीला हळू हळू पाण्यात सोडावे.