Mumbai Anant Chaturdashi 2019 : लाडक्या बाप्पाचे जल्लोषात विसर्जन, गणेशभक्तांचे डोळे पाणावले
अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला भक्तांचा जनसागर उसळणार आहे. मुंबईतील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकांचे लाईव्ह अपडेट्स
मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ उसळला आहे. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप (Anant Chaturdashi 2019) दिला जात आहे.
गणपती विसर्जन मिरवणूक लाईव्ह अपडेट
[svt-event title=”लालबागचा राजा दोन टाकी परिसरातून गिरगावकडे मार्गस्थ” date=”13/09/2019,12:10AM” class=”svt-cd-green” ] लालबागचा राजा टोन टाकी परिसरात दाखल, गणेशभक्तांकडून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरु [/svt-event]
[svt-event title=”गणेशगल्ली आणि तेजुकायाच्या राजाचं विसर्जन ” date=”12/09/2019,11:48PM” class=”svt-cd-green” ] मुंबईचा राजा आणि तेजुकायाच्या राजाचं गिरगाव येथे विसर्जन, गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या, या जयघोषांनी गिरगाव परिसर दुमदुमला [/svt-event]
[svt-event title=”लालबागचा राजा भायखळ्यातील खटाव मिल परिसरात दाखल” date=”12/09/2019,8:47PM” class=”svt-cd-green” ] मुंबई गणपती विसर्जनाचा उत्साह, लालबागचा राजा भायखळ्यातील खटाव मिल परिसरात दाखल [/svt-event]
[svt-event title=”चिंचपोकळीचा चिंतामणीवर पुष्पवृष्टी” date=”12/09/2019,6:55PM” class=”svt-cd-green” ] शतकपूर्ती चिंचपोकळीचा चिंतामणीची विसर्जन मिरवणूक श्रॉफ बिल्डींगजवळ, लवकरच श्रॉफ बिल्डींगवरुन चिंतामणीवर पुष्पवृष्टी होणार [/svt-event]
[svt-event title=”गणेशगल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल” date=”12/09/2019,6:45PM” class=”svt-cd-green” ] गणेशगल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, तर तेजुकायाचा गणपतीचे विसर्जनासाठी सज्ज, थोड्याच वेळात दोन्ही गणपतींचे विसर्जन [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील समुद्रात 9 हजार 365 गणपतींचे विसर्जन” date=”12/09/2019,6:42PM” class=”svt-cd-green” ] संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईतील समुद्रात 9 हजार 365 गणपतींचे विसर्जन, तर कृत्रिम तलावात 1 हजार 254 गणपतींचे विसर्जन, मुंबईतील समुद्रात 383 सार्वजनिक गणपती , 8 हजार 918 घरगुती गणपती, 64 गौरींचे विसर्जन, तसेच कृत्रिम तलावात 9 सार्वजनिक गणपती, 1 हजार 245 घरगुती गणपतींचे विसर्जन [/svt-event]
[svt-event title=”लालबागच्या राजाची मिरवणूक भायखळा परिसरात दाखल” date=”12/09/2019,6:13PM” class=”svt-cd-green” ] लालबाग राजाची ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक, लालबाग राजा भायखळ्यातील बकरीअड्डा परिसरात, भक्तांचा जल्लोष [/svt-event]
[svt-event title=”विसर्जन मिरवणुकीदरम्यान ‘परळचा राजा’ उड्डाणपुलाखाली अडकला” date=”12/09/2019,1:43PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : विसर्जन मिरणुकीदरम्यान ‘परळचा राजा’ उड्डाणपुलाखाली अडकला, मूर्तीला धक्का पोहचू नये म्हणून कार्यकर्त्यांकडून काळजी, मूर्ती काढण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरु
LIVETV | ‘परेलचा राजा’ उड्डाणपुलाखाली अडकला https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/qi7HFTf6Lk
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”श्रॉफ बिल्डिंग पुष्यवृष्टीचा पहिला मान तेजुकाया गणपतीला” date=”12/09/2019,11:27AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : श्रॉफ बिल्डिंग पुष्यवृष्टीचा पहिला मान तेजुकाया गणपतीला, श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीचे यंदा 50 वे वर्ष, तेजुकाया गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ
#Ganeshotsav2019 श्रॉफ बिल्डिंग पुष्यवृष्टीचा पहिला मान तेजुकाया गणपतीला, श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीचे यंदा 50 वे वर्ष @dineshdukhande pic.twitter.com/876l7vu1QS
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”लालबागचा राजा विसर्जनासाठी निघाला” date=”12/09/2019,11:02AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | लालबागचा राजा मार्गस्थ https://t.co/MOaOLKxkHy pic.twitter.com/p66ncpQ1Jo
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”गणेशगल्लीच्या गणपतीची मिरवणूक” date=”12/09/2019,10:08AM” class=”svt-cd-green” ]
गणेशगल्लीच्या गणपतीच्या मिरवणुकीची नयनरम्य दृश्यं https://t.co/MOaOLKxkHy pic.twitter.com/t12k4TUIvO
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार” date=”12/09/2019,10:03AM” class=”svt-cd-green” ]
Anant Chaturdashi Live Update | ‘लालबागचा राजा’ची आरती https://t.co/MOaOLKxkHy pic.twitter.com/cKYfJ48zFD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
[svt-event title=”लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी भक्तांचा जल्लोष” date=”12/09/2019,9:57AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”गणेशगल्ली गणपती बाप्पाची आरती” date=”12/09/2019,9:56AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”तेजुकाया गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात” date=”12/09/2019,9:55AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event date=”12/09/2019,8:37AM” class=”svt-cd-green” ]
#AnantChaturdashi 2019 Live Update | मुंबईत गणेशगल्लीच्या मिरवणुकीला सुरुवात https://t.co/MOaOLKxkHy pic.twitter.com/eARGVcsKuz
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
[svt-event date=”12/09/2019,8:23AM” class=”svt-cd-green” ]
#AnantChaturdashi 2019 Live Update | मुंबईतील तेजूकायाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/FFtodlJ8D1
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 12, 2019
[/svt-event]
मुंबईत आज पाच हजार 630 (5,630) सार्वजनिक गणेश मूर्ती, तर 31 हजार 72 (31,072) घरगुती गणपतींचं विसर्जन होईल, असा अंदाज आहे. शहरातील एकूण 129 जागांवर विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये गिरगाव, दादर, माहिम, जुहू, मार्वे यासारख्या समुद्र चौपाटी, विविध तलाव आणि कृत्रिम तलावांचा समावेश आहे.
लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), गिरगावचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, खेतवाडीचा राजा, केशवजी नाईक चाळ गणपती, फोर्टचा राजा, अखिल चंदनवाडीचा गणपती अशा अनेकविध गणपती बाप्पांच्या मूर्तींचं मुंबईत विसर्जन होतं. यानिमित्त गणेशभक्तांची मोठी गर्दी मिरवणुकीत पाहायला मिळते.
अनंतचतुर्दशीनिमित्त गुरुवारी गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. जवळपास 40 हजार पोलिसांचा फौजफाटा शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय SRPF, QRT, FORCE ONE, RAF आणि होमगार्डही तैनात आहेत.
पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरांची गणेश भक्तांच्या गर्दीवर निगराणी असेल. तीन ड्रोन कॅमेरांचाही यावेळी वापर केला जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या बातम्या एकाच लिंकवर
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला (Anant Chaturdashi 2019) लाखो भक्तांचा जनसागर उसळतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत किंवा बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील 53 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 56 मार्गांवर एकेरी वाहतूक सुरु राहील, तर 99 रस्त्यांवर गाडी पार्क करण्याची परवानगी नसेल.
गणपती विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे समुद्रात बोटीच्या माध्यमातूनही गस्त घालण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेची वैद्यकीय कॅम्प आणि अग्निशमन दलही तैनात करण्यात आले आहेत.
Anant Chaturdashi 2019 | गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल?