Ananth Chaturdashi 2019 : गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त

दहा दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्‍पाची (Ganpati Bappa) मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे(Ganesh Visarjan). आज अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे.

Ananth Chaturdashi 2019 : गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त
Follow us
| Updated on: Sep 12, 2019 | 9:15 AM

मुंबई : दहा दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्‍पाची (Ganpati Bappa) मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे(Ganesh Visarjan). आज अनंत चतुर्थीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसांनंतर म्हणजेच अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशी असते. या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात बाप्पाची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्‍णूच्या अनंत रुपांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक उपवास धरुन अनंत सूत्रही बांधतात. याच दिवशी गणपती विसर्जनही केलं जातं.

ज्याप्रकारे बाप्पाच्या आगमनावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जातं. त्याचप्रकारे ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात बाप्पाची विसर्जन मिरवणूकही निघते. विसर्जनाशिवाय बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. बाप्पाची स्थापना जशी मुहुर्तावर केली जाते, तसेच बाप्पाचं विसर्जनही मुहुर्तावर होणे आवश्यक असते.

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त (Ganpati Visarjan Muhurt)

चतुर्दशी तिथी : 12 सप्टेंबर, 2019, सकाळी 05:06 वाजल्यापासून

चतुर्दशी तिथी समाप्त : 13 सप्टेंबर, 2019, सकाळी 07:35 वाजेपर्यंत

शुभ मुहूर्त :

सकाळी 06:16 ते सकाळी 07:48 वाजेपर्यंत आणि सकाळी 10:51 ते दुपारी 03:27 वाजेपर्यंत, सायंकाळी 04:59 ते 06:30 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 06:30 ते रात्री 09:27 वाजेपर्यंत, रात्री 12:23 ते 01:52 वाजेपर्यंत

पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार

आपल्या लाडक्या बाप्पाला आज जड अंत:करणाने निरोप द्यावा लागणार आहे. दहा दिवस ज्या बाप्पाला आपण घरी आणले, ज्याची इतक्या मनोभावे पुजा केली, त्याला आज निरोप देताना नक्कीच आपले डोळे पाणावतील. मात्र, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, म्हणत ज्या बाप्पा आपण आज निरोप देऊ, तो बाप्पा पुढच्या वर्षी आपल्याला लवकरच भेटायला येणार आहे. बाप्पा पुढील वर्षी 11 दिवस लवकर येणार आहे. पुढील वर्षी शनिवारी 22 ऑगस्ट, 2020 रोजी गणेश चतुर्थी येते आहे. त्यामुळे बाप्पा लवकरच आपल्याला पुन्हा दर्शन देणार आहे.

संबंधित बातम्या :

Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात गणपती विसर्जनासाठी वाहतुकीतील बदल

Anant Chaturdashi 2019 | गणपती विसर्जनानिमित्त मुंबईतील कोणकोणत्या मार्गांमध्ये बदल?

Ananth Chaturdashi 2019 : पुण्यात मानाचे पाच गणपती विसर्जनासाठी सज्ज

Anant Chaturdashi Live Update | गणेशगल्ली, तेजूकायाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.