किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका

पेडणेकरांनी फोर्जरी (खोट्या सह्या) केल्या," असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. (BJP Leader Kirit Somaiya on Mumbai Mayor Kishori Pednekar) 

किशोरी पेडणेकरांवर कारवाई का नाही? सोमय्यांची महापौर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 1:02 PM

मुंबई : “मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात दोन महिन्यांपासून पेपर काढतो आहे. पुरावे देत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही किशोरी पेडणेकरांवर कारवाई केली जात नाही. पेडणेकरांनी फोर्जरी (खोट्या सह्या) केल्या,” असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. (BJP Leader Kirit Somaiya on Mumbai Mayor Kishori Pednekar)

“मी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईच्या महापौरांसंदर्भात पेपर काढतो आहे, पुरावे देत आहे. अनिल परब यांनी मध्यमवर्गीय लोकांची जमीन लाटली. यांच्यावर कारवाई का करत नाही? मुद्दा मी डायव्हर्ट करत नाही तर ते करत आहेत. यासंदर्भात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई मनपाविरोधात याचिका दाखल केली आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

“शिवसेना खासदार संजय राऊत किंवा आणखी कुठल्या शिवसेना नेत्यामध्ये हिंमत असेल तर बोलावं, भूखंडाचं श्रीखंड तयार करणारं हे सरकार आहे. दिवाळीच्या आधी तीन धमाके करणार सांगितलं होतं, 30 नोव्हेंबरला ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीला आणखी धमाके करणार,” असेही किरीट सोमय्यांनी सांगितले.

“दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले. 345 कोटी दिले. दहिसर भूखंडाचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहे. याबाबत मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे,” असेही सोमय्या म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांनी 12 हजार कोटींचा पाच हजार बेड्सचा प्रकल्प आणला. तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारने कौटुंबिक मित्राकडून घेतली. राज्यपाल कोश्यारींकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यांनी स्युमोटो दाखल केली आहे.”

“अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत केले,” असा घणाघातही सोमय्यांनी केला.

“रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहे, उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे,” असेही किरीट सोमय्या म्हणाले.  (BJP Leader Kirit Somaiya on Mumbai Mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत

गुन्हेगाराला भेटायला तुरुंगात जाता, अर्णव तुमचा कोण लागतो?, संजय राऊतांचा भाजप नेत्यांना सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.