ब्लास्ट करो…ब्लास्ट करो…, पब्जी खेळताना तरुणाचा मृत्यू
इंदौर (मध्य प्रदेश) : तरुण आणि लहान मुलांमध्ये पब्जी गेम मोठ्या प्रमाणात खेळला जातो. पण हा गेम खेळणे म्हणजे आता तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. इंदौरमधील एका मुलाचा मोबाईलवर सलग 6 तास पब्जी खेळण्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला मुलगा हा बारावीत शिकत होता. फुरकान कुरेशी असं मृत मुलाचे नाव आहे. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी […]
इंदौर (मध्य प्रदेश) : तरुण आणि लहान मुलांमध्ये पब्जी गेम मोठ्या प्रमाणात खेळला जातो. पण हा गेम खेळणे म्हणजे आता तरुणांसाठी धोकादायक ठरत आहे. इंदौरमधील एका मुलाचा मोबाईलवर सलग 6 तास पब्जी खेळण्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला मुलगा हा बारावीत शिकत होता. फुरकान कुरेशी असं मृत मुलाचे नाव आहे.
कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी दुपारी जेवण झाल्यानंतर फुरकान मोबाईलवर पब्जी खेळत होता. तो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पब्जी खेळत होता आणि अचानक त्याला राग आला. तसेच त्याच्या सहकाऱ्यांना म्हणजेच पब्जी खेळाडुंवर तो ओरडू लागला आणि अचानक तो जमिनीवर पडला.
फुरकानला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित केले. कार्डियोलॉजिस्ट डॉ. अशोक जैन म्हणाले, “मुलाला जेव्हा आणले तेव्हा त्याची नाडी चालत नव्हती. आम्ही त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण अपयशी ठरलो”.
फुरकानची बहिण त्याच्या बाजूला बसली होती, ती म्हणाली, “माझा भाऊ त्याच्या मित्रांसोबत पब्जी खेळत होता. अचानक तो ब्लास्ट करो….ब्लास्ट करो, असं मोठ्याने ओरडू लागला. यानंतर त्याने आपले एअरफोन काढले आणि मी तुझ्यासोबत खेळणार नाही. तुझ्यामुळे मी गेममध्ये हरलो आणि रडू लागला”.
“गेमच्या दरम्यान खेळताना अतिउत्साहाने त्याला कार्डियक अरेस्ट आला असेल. अशा गेमपासून मुलांनी लांब राहा. कारण अधिक उत्साहमुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकते. यामुळे तुम्ही तुमचे प्राण गमवू शकता”, असंही डॉक्टर म्हणाले.
फुरकान नेहमी पब्जी गेम खेळायचा आणि त्यामध्ये रमलेला असायचा. 18-18 तास फुरकान पब्जी खेळत होता. मी पण हा गेम खेळायचो पण भावाच्या मृत्यूमुळे मी हा गेम मोबाईलमधून डिलीट केला, असं फुरकानच्या भावाने सांगितलं.