Pune Lockdown | 10 अधिकारी, 110 जवानांसह पुण्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी येणार

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी पुण्यात पुणे पोलिसांच्या मदतीसाठी येणार आहे. या तुकडीत दहा अधिकारी आणि 110 जवान असणार आहेत.

Pune Lockdown | 10 अधिकारी, 110 जवानांसह पुण्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी येणार
Follow us
| Updated on: May 13, 2020 | 11:39 PM

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखता (Central Armed Police Forces) यावा आणि लॉकडाऊनचं पालन केलं जावं यासाठी पुण्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची तुकडी येणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी पुण्यात पुणे पोलिसांच्या मदतीसाठी येणार आहे. या तुकडीत दहा अधिकारी आणि 110 जवान (Central Armed Police Forces) असणार आहेत.

पुण्यात सध्या 69 कंटेनमेंट झोन असून या भागासह इतर ठिकाणी पोलिसांच्या मदतीला सीआरपीएफ असेल. नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी केली होती. त्यानुसार, पुणे पोलीस दलाला 120 जवानांची एक तुकडी मदतीला येणार आहे. सातत्यानं ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर ताण आला आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या सीआरपीएफच्या तुकडीने पोलिसांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

पुण्यात 22 पोलिसांना कोरोना

पुण्यात आतापर्यंत 22 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर फरासखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप लोंढे यांचा मृत्यू झाला. तर 30 पेक्षा अधिक पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं. तर पोलिसांच्या मदतीला एसपीओ ही तैनात आहेत. मात्र सातत्यानं ड्युटीवर असलेले पोलिसांवर ताण आला आहे.

त्याचबरोबर 45 वर्षांवरील दमा, खोकला, सर्दी, रक्तदाब आणि डायबेटिस असलेल्या पोलिसांना, अधिकाऱ्यांना नाकाबंदी आणि फिल्डवरची ड्युटी न देण्याचा निर्णय घेतला. तर पन्नास वर्षेवरील पोलिसांना फिल्डऐवजी पोलीस ठाण्यात कार्यालयीन काम दिलं जाणार आहे. 45 आणि 50 वयोगटातील पोलीस, अधिकाऱ्यांना कोरोना प्रभाव क्षेत्रातील ड्युटीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. अपुरं मनुष्यबळ आणि ताणतणावमुळे सीएपीएफ पुणे पोलिसांच्या मदतीला येणार आहे.

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राची 20 सुरक्षा पथकं पाठवा : गृहमंत्री

राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा पथकांची मागणी केली आहे. केंद्राने 20 पथकं महाराष्ट्रात पाठवावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान आणि येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (Central Armed Police Forces) 20 पथकांची मागणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

महाराष्ट्रात राज्य राखीव पोलीस दलाच्या 32 कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाचा विळखा 

महाराष्ट्रात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण 925 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 100 अधिकारी आणि 825 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 84 अधिकारी आणि 709 अशा एकूण 793 पोलिसांना कोरोना लक्षणे दिसून येत आहेत. तर 16 अधिकारी आणि 108 पोलीस कर्मचारी असे एकूण 124 जण बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 8 पोलिसांचा (Central Armed Police Forces) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

पोलिसांना विश्रांतीची गरज, केंद्राची 20 सुरक्षा पथकं पाठवा, राज्याची केंद्राकडे मागणी

Maharashtra Corona Patient | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजारच्या उंबरठ्यावर, मुंबई, पुण्यासह कुठे किती रुग्णांची वाढ?

सोलापूरमध्ये 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

Curfew Violation | संचारबंदी उल्लंघन प्रकरणी एक लाख पाच हजार गुन्हे, 20 हजार जणांना बेड्या

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...