Hathras Rape | अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

हाथरसमधल्या सामूहिक बलात्कार पिडीतेच्या मृत्यूवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. त्यावर महाराष्ट्रात परिस्थितीवर ट्विट करावसं वाटलं नाही का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विचारला. (Chitra Wagh Criticized home Minister Anil Deshmukh)

Hathras Rape | अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 10:52 PM

मुंबई : उत्तर प्रदेशातल्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेचा आज उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पीडितेला श्रद्धांजली देणारं ट्विट करताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. गृहमंत्र्यांच्या टीकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची आठवण करून दिली. (Chitra Wagh Criticized home Minister Anil Deshmukh)

हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेला श्रद्धांजली अर्पण करताना, ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असा निशाणा अनिल देशमुख यांनी योगींवर साधला. त्यावर “कोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार, विनयभंग केले जातात …कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय, त्यावर तुम्हाला ट्वट करावंसं वाटलं नाही का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना विचारला.

“गृहमंत्रीजी, हाथरसच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेधच करतो. पण मला सांगा राज्यात अल्पवयीन मुलींवर सामुहीक बलात्कार करून खूनाचं सत्र सुरू आहे. कोविड-क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार होतायत, विनयभंग केले जातात, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय… त्यावर तुम्हाला ट्विट करावंसं वाटलं नाही का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांना विचारला.

तत्पूर्वी, उत्तर प्रदेशातल्या हासरतमधील सामूहिक बलात्कार पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. योगी आदित्यनाथजी गुन्हेगारांना शासन करा. पण ‘फिल्म सिटी’ऐवजी ‘गुंडांपासून क्लिन सिटी’वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल, असा सल्ला अनिल देशमुख यांनी योगी आदित्यनाथ यांना दिला होता. तसंच यूपी की निर्भया को न्याय दो, असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला.

उत्तर प्रदेशातील घटनवरून महाराष्ट्रातील दोन नेते आमनेसामने आले. ट्विटरवरून त्यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. याअगोदरही चित्रा वाघ-अनिल देशमुख यांच्यात कायदा सुव्यवस्थेच्या तसंच महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून ट्विटर वॉर रंगलं आहे.

(Chitra Wagh Criticized home Minister Anil Deshmukh)

संबंधित बातम्या

Amravati | प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये CCTV लावा, अमरावतीच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची मागणी

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.