पिंपरीत कोरोनासह सारीचा रुग्ण, कोरोना रुग्णात आढळले सारीची लक्षणं

पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनासह आता सारी आजाराचे संकट ओढावले आहे. एका महिलेमध्ये सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात सारीची लक्षणं आढळून (Sari patient in pimpri chinchwad) आली आहेत.

पिंपरीत कोरोनासह सारीचा रुग्ण, कोरोना रुग्णात आढळले सारीची लक्षणं
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 8:29 PM

पिंपर चिचवड : पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनासह आता सारी आजाराचे संकट ओढावले आहे. एका महिलेमध्ये सिव्हीअरली अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस अर्थात सारीची लक्षणं आढळून (Sari patient in pimpri chinchwad) आली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सारी आणि कोरोनाची लक्षणं ही एकसारखीच आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील महिलेला सारीसह कोरोनाचीही लागण झाल्याचे निष्पन्न झाले (Sari patient in pimpri chinchwad) आहे.

राज्यात कोरोना विषाणूचे आव्हान असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये आता सारी आजार पसरल्याचे समोर आलं आहे. औरंगबाद, हिंगोली, पिंपरी चिंचवड येथे सारी आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सारी आणि कोरोनाची लक्षणं एकसारखीच असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे सारीच्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचेही समोर आलं आहे. त्यामुळे सारीच्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवलं जात आहे.

औरंगाबादमध्ये दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू 

औरंगाबादमध्ये सारी आजाराचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कारण गेल्या दहा दिवसात तब्बल 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाला आहे. 29 एप्रिल ते 7 मार्च या दहा दिवसात 11 जणांचा सारी आजाराने मृत्यू झाल्याने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामधील एक रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह होता.

हिंगोलीत 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू 

हिंगोली शहरातील एका 19 वर्षीय मुलीचा सारी आजाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर या युवतीच्या घरातील आठ जणांना हिंगोलीच्या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे.

सारी आजार म्हणजे काय?

सेवीअर अ‍ॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस अर्थात सारी आजाराची लक्षणं ही कोरोना सारखीच आहेत. यामध्ये रुग्णाला सर्वसाधारणपणे 38 अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणिश्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं असतात. हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे.

दरम्यान, पिपरी चिंचवडमध्ये आता एकूण 22 कोरोना रुग्ण झाले आहेत. यातील 12 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. गेल्या बारा तासाच्या आतच 2 रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.