डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई

डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने कोरोनासारख्या संकटावर आपण सहज मात करू शकतो, असं मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. (Defeat the corona with the help of digital technology Says Subhash desai)

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 11:03 PM

मुंबई : डिजिटल तंत्रज्ञान आणि साधनांच्या मदतीने कोरोनासारख्या संकटावर आपण सहज मात करू शकतो, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. (Defeat the corona with the help of digital technology Says Subhash desai)

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या ‘सीआयआय हॉस्पिटल टेक-२०२०’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी देसाई बोलत होते. यावेळी ब्रिटीश उप उच्चायुक्त अँलन गेमेल, डॉ. रमाकांत देशपांडे, सुधीर मेहता, जॉय चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

राज्य सरकार कोव्हिड संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोव्हिड चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली. आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढवला आहे. येत्या काळात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांची चाचणी केली जाईल. प्रतिदिन सुमारे दीड लाख चाचण्या करण्याचा शासनाचा मानस आहे, असं देसाई म्हणाले.

नुकतेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने सुरू केली आहे. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. नवीन तंत्रज्ञान नेहमीच उपयुक्त ठरते. त्याचा वापर करून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं देखील देसाई यांनी सांगितलं.

दरम्यान, सीआयआयच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या टेलिआयसीयू प्रकल्पास राज्य शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही देखील मंत्री देसाई यांनी दिली. (Defeat the corona with the help of digital technology Says Subhash desai)

चार दिवस चालणाऱ्या या डिजिटल प्रदर्शनात 60 पेक्षा अधिक देशातील कंपन्या सहभागी होणार आहेत. आरोग्यविषयक 300 पेक्षा अधिक उत्पादने या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत. या उपक्रमास नेदरलँडने भागीदार देश म्हणून पाठिंबा दर्शविला आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले ‘जम्बो’ कोव्हिड सेंटर ‘कुपोषित’, ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धूळखात

मुंबई महापालिकेचा कोरोनावर 1300 कोटींचा खर्च, पहिल्यांदाच बँकेतील ठेवींना हात

(Defeat the corona with the help of digital technology Says Subhash desai)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.