Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!

पालघर स्थानकावर चार संशंयित कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या हातावर क्वारंटाईन केल्याचे शिक्के (Quarantine stamp Corona Patient Palghar) होते.

Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!
Follow us
| Updated on: Mar 18, 2020 | 5:13 PM

पालघर : देशात कोरोनाबाधितांची संख्या 149 वर पोहोचली (Quarantine stamp Palghar Corona Patient) आहे. तर राज्यात 42 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत असून यामुळे सर्व जनतेला गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केलं आहे. नुकंतच पालघर स्थानकावर चार कोरोना संशंयित रुग्ण आढळले आहेत. या सर्वांच्या हातावर क्वारंटाईन केल्याचे शिक्के होते. तरीही हे रुग्ण गरीब रथ एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान (Quarantine stamp Palghar Corona Patient) वांद्र्याहून दिल्लीकडे गरीबरथ एक्सप्रेस या गाडीत चार कोरोना संशयित रुग्ण प्रवास करत होते. G4-G5 या डब्ब्यातून हे रुग्ण प्रवास करत असताना पालघर स्टेशन दरम्यान काही प्रवाशांना शंका आली. तसेच तिकीट तपासनीस यांनीही याबाबतच चौकशी केली. त्यावेळी त्या चौघांच्या हातावर विलगीकरण (क्वारंटाईन) केल्याचे शिक्के होते.

हे चारही जण जर्मनीहून मुंबईत आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून ते चौघे सूरतला जात होते. मात्र त्या दरम्यान प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे या गाडीला पालघर स्थानकावर थांबा देत या संशयित रुग्णांना पालघरला उतरवण्यात आले.

पालघरच्या आरोग्य पथकाकडून त्यांची तपासणी सुरु आहे. त्यांना त्यांच्या मूळ गावी खाजगी वाहनातून रवानगी करण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान हातावर विलगीकरण (क्वारंटाईन) केल्याचे शिक्के असणाऱ्यांना रेल्वेचा प्रवास करण्यास मज्जाव केला आहे. मात्र तरीही हे रुग्ण प्रवास करत होते.

तर दुसरीकडे डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात एका रुग्णाला विलगीकरण वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत आहेत.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 8
  • मुंबई – 7
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 42

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • मुंबई (1) – 17 मार्च
  • पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
  • पुणे (1) – 18 मार्च
  • एकूण – 42 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

(Quarantine stamp Palghar Corona Patient)

संबंधित बातम्या : 

Temples Closed | राज्यभरात देऊळ बंद, मंदिर परिसरात शुकशुकाट, कोणकोणती मंदिरं बंद?

परदेशातून आलेल्या प्रवाशांची प्राधान्याने चाचणी, 4 नव्या लॅब, नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ : टोपे

पुण्यात कोरोनाग्रस्त वाढले, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.