कलेक्टरची नोकरीही गेली, निवडणुकीतही पराभव

रायपूर: पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झालाय. गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेलं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हातातून गेलंय, तर राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता आली आहे. पण भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना या निकालाचा मोठा फटका बसलाय. अशीच गोष्ट छत्तीसगडमधील एका आयएएस अधिकाऱ्याची आहे. कलेक्टर असलेल्या या अधिकाऱ्याने सरकारी नोकरी सोडून भाजपात प्रवेश केला. पण छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत […]

कलेक्टरची नोकरीही गेली, निवडणुकीतही पराभव
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

रायपूर: पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सुपडासाफ झालाय. गेल्या 15 वर्षांपासून सत्ता असलेलं मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हातातून गेलंय, तर राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता आली आहे. पण भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना या निकालाचा मोठा फटका बसलाय. अशीच गोष्ट छत्तीसगडमधील एका आयएएस अधिकाऱ्याची आहे. कलेक्टर असलेल्या या अधिकाऱ्याने सरकारी नोकरी सोडून भाजपात प्रवेश केला. पण छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत पराभव गेल्याने ‘ना घर का ना घाट का’ अशी परिस्थिती या अधिकाऱ्याची झाली आहे.

ओपी चौधरी यांनी राजीनामा देऊन थेट भाजपात प्रवेश केला होता. लोकसभेत किंवा इतर राज्यांच्या विधानसभेत भाजपची कामगिरी पाहता आजही अनेक उमेदवार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असतात. मात्र पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. हिंदी भाषिक मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. याचा फटका भाजपमध्ये बाहेरुन आलेल्या उमेदवारांना बसला आहे.

रायपूर पूर्वचे माजी कलेक्टर ओ. पी. चौधरी यांनी आयएएसची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. ओ. पी. चौधरी यांनी खरसिया मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव काँग्रेसच्या उमेश पटेल यांनी केला. मतदान पाहिले तर ओ. पी. चौधरी यांना 77,234, तर विजयी उमेदवार उमेश यांना 94,201 मत मिळाले आहेत.

निवडणूक सुरु होण्याआधीच कलेक्टर ओपी चौधरी यांनी मोठ्या थाटात भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ओ. पी. चौधरी हे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या जवळचे असल्याचं बोललं जातं.

ओ. पी. चौधरी 2005 च्या बॅचचे आयएएस आधिकारी आहेत. त्यांनी 22 ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रायपूरचे कलेक्टर म्हणून काम केलेल्या चौधरी यांनी नक्षल प्रभावी भागातही काम केलं आहे, तसेच ते दंतेवाडाचे कलेक्टर राहिले आहेत. चौधरी यांना उत्कृष्ट प्रशासनिक कामांसाठी प्रधानमंत्री पुरस्कारही मिळाला आहे.

छत्तीसगडमधील मतदान पाहिले तर, काँग्रेस 68 जागांवर निवडून आली आहे. भाजपा केवळ 15 जागेवर तर बसपा दोन जागांवर आणि जनता काँग्रेस पार्टी पाच जागांवर निवडून आली आहे. मतदानाची टक्केवारी पाहिली तर काँग्रेसला 43 टक्के, भाजप 33 टक्के,  बसपा 3.9 टक्के आणि जेसीसीजेला 7.6 टक्के मत मिळाले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.