IPL 2020, CSK vs SRH : कॅप्टन कूलचा संयम सुटला, महेंद्रसिंह धोनी भरमैदानात अंपायरवर भडकला
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी अंपायर पॉल रायफल यांच्यावर भडकला.
शारजा : महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्यासाठीच धोनीला कॅप्टन कूल म्हटलं जातं. परिस्थिती कशीही असो, धोनी कधीही आपला सयंम सोडत नाही.मात्र आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात धोनी आपल्या स्वभावाविरोधात वागला. या सामन्यात सर्वांना रागवलेल्या धोनीचे दर्शन झाले. कधीही आक्रमक न होणारा धोनी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यात आक्रमक झालेला पाहायला मिळाला. धोनीने फिल्ड अंपायरविरुद्ध नाराजी व्यक्त केली. ipl 2020 csk vs srh chennai skipper mahendra singh dhoni angry over umpire paul reiffel decision to give wide ball
https://twitter.com/VamosVirat/status/1316089835782762496
नक्की काय झालं?
चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात 13 ऑक्टोबरला सामना खेळण्यात आला. या सामन्यातील दुसऱ्या डावात हैदराबाद विजयी आव्हानाचं पाठलाग करत होती. धोनीने 19 वी ओव्हर शार्दुल ठाकूरला टाकायला दिली. तेव्हा हैदराबादकडून राशिद खान आणि शाहबाज नदीम बॅटिंग करत होते. या ओव्हरमधील दुसरा बॉल शार्दूलने वाईड टाकला. त्यामुळे शार्दुलला तो चेंडू पुन्हा टाकावा लागला. शार्दुलने पुन्हा टाकलेला हा चेंडू वाईड रेषेच्या जवळपास पडला. तेवढ्यात फिल्ड अंपायर पॉल रॉयफल वाईड बॉल देणार होते. त्यासाठी त्यांनी थोडेफार हातही उघडले. मात्र तेवढ्यातच स्टंपमागे उभा असलेला कर्णधार धोनी आणि बोलर शार्दुलने नकारात्मक मान हलवली. तेवढ्यात वाईड देता देता अपांयरने आपला निर्णय मागे घेतला.
यासर्व प्रकारामुळे समालोचकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तसेच ड्रेसिंग रुममध्ये असलेला हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने यासर्व प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच धोनीच्या मैदानावरील अशा वागणुकीमुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. वाईड बॉल न देण्यासाठी अंपायरवर दबाव निर्माण केला. तसेच धोनी स्वत:ला अंपायर समजतो का, यासारखे अनेक प्रश्न नेटीझन्सने उपस्थित केले.
Dhoni always bullying umpire in crucial situations.Not deserving atleast fair play award. pic.twitter.com/jyLSdO14bd
— Er. Lucky Singh Jatt (@LuckySinghJatt6) October 13, 2020
MS Dhoni – The CaptainMS Dhoni – Wicket KeeperMS Dhoni – Umpire
Atleast, Let the umpire do their their job pic.twitter.com/eciLMCrRyL
— Shivam (@ShivamChatak) October 13, 2020
धोनीने याआधीही अशाप्रकारे अंपायरसोबत हुज्जत घातली आहे. 2019 मध्ये नो बॉल दिल्यानंतर निर्णय बदलल्याने धोनीने थेट मैदानात शिरत पंचांसोबत वाद घातला होता. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अंपायरसोबत केलेल्या गैरवर्तणामुळे धोनीला दंड ठोठावण्यात आला होता.
दरम्यान चेन्नईने प्रथम बॅटिंग करताना हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेच गमावून 147 धावाच करता आल्या. अशाप्रकारे चेन्नईने हैदराबादवर 20 धावांनी मात केली. या विजयासह चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये 6 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2020, SRH vs CSK : चेन्नई सुपर किंग्जसची सनरायजर्स हैदराबादवर 20 धावांनी मात
ipl 2020 csk vs srh chennai skipper mahendra singh dhoni angry over umpire paul reiffel decision to give wide ball