कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांना केडीएमसी 50 लाखांची मदत देणार, महासभेत ठराव मंजूर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांना केडीएमसी 50 लाखांची मदत देणार, महासभेत ठराव मंजूर
Follow us
| Updated on: Oct 19, 2020 | 11:52 PM

मुंबई : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज केडीएमसीच्या महासभेत या दोघांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. (KDMC to provide Rs 50 lakh to family of corporators who died due to corona, General Assembly approves resolution)

राजेंद्र देवळेकर आणि दशरथ घाडीगावकर या दोन्ही नगरसेवकांनी कोव्हिडच्या काळात चांगले काम केले. कोरोना महामारीच्या काळात समाज उपयोगी काम केली, गरजू लोकांना मदतीचा हात दिला. या काळात काम करत असताना दोघांनाही कोरोनाची लागण झाली. परंतु उपचारांदरम्यान दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

हे दोघे केडीएमसीच्या कोव्हिड समितीत होते. त्यासाठी दोघांना मदत करण्याची घोषणा केली असल्याची माहिती महापौर विनिता राणे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते राहूल दामले यांनी याबाबत मागणी केली होती. त्यानुसार दोन्ही नगरसेवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या परिवहन सदस्याला मदत मिळणार की नाही याविषयी अद्याप सुस्पष्टता नाही.

मिरा भाईंदर आणि ठाण्यात नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू

मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शिवसेनेच्या या नगरसेवकावर ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ठाण्यात राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख (49) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच शिवसेनेचे अन्य एक नगसेवक नितीन साळवे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, अजित पवार हळहळले

औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

(KDMC to provide Rs 50 lakh to family of corporators who died due to corona, General Assembly approves resolution)

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.