जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली, इचलकरंजीत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातील इचलकरंजी शहरासह संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

जमावबंदीच्या आदेशाला केराची टोपली, इचलकरंजीत रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 5:56 PM

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर (Police Action On Crowd) इचलकरंजी शहरासह संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. असं असतानाही इचलकरंजीत रस्त्यावर विनाकारण वाहनांसह गर्दी करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाईचा (Police Action On Crowd) बडगा उगारला आहे.

महात्मा गांधी पुतळा, कॉ. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सांगली नाका परिसरात अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे , पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी वाहनधारकांवर कारवाई केली. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय, दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

हेही वाचा : Corona | वेल्हा परिसरातील तब्बल 26 गावं क्वारंटाईन, महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूची (Janta Curfew) हाक दिली होती. त्यामुळे रविवारी सकाळी ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत या जनता कर्फ्यूला इचलकरंजीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र, सोमवारी जनता कर्फ्यू संपल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसह दैनंदिन व्यवहारासाठी पहाटेपासूनच नागरिक रस्त्यावर गर्दी करु लागले होते.

सकाळी दहानंतर मुख्य मार्गावरील सर्वच दुकाने उघडण्यात आली होती. तर भाजीपाला विक्रीसाठीही मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले होते. याचा परिणाम मुख्य रस्त्यावर प्रचंड गर्दीसह वाहतूकीची कोंडी होऊ लागली (Police Action On Crowd) होती. त्यामुळे नाईलाजास्तव जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

कारवाई दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या वाहनधारकांना वगळता अन्य वाहनाधारकांवर कारवाई करुन त्यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी काही ठिकाणी वादाचे प्रसंगही घडले.

या संकटप्रसंगात केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे शासनाने आदेश पारीत केले आहेत. असे, असताना शहरातील विविध भागात त्याकडे दुर्लक्ष करुन दुकाने, व्यवसाय, यंत्रमाग कारखाने सुरु करण्यात आले होते. अशा जवळपास 130 वाहनधारक आणि 60 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

गावभाग पोलिसांनी अनेक सुरु असलेल्या दुकानचालकांना ताब्यात घेतले. तसेच, अन्य आस्थापना सुरु ठेवणार्‍या दुकानदारांना सूचना करत दुकाने बंद करण्यास सांगितले. तर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सह पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे आणि पथकांकडून वाहतूक सुरळीत (Police Action On Crowd) करण्यासह रस्त्यावर पार्किंग करणारे वाहनधारक आणि ट्रिपलसीट फिरणार्‍यांवर कारवाई केली.

संबंधित बातम्या :

Corona | ‘या’ अटींसह मुंबईतील उपाहारगृह सुरु ठेवण्याची मुभा

Lock Down | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला

Corona death | मुंबई-वाशी-दिल्ली पुन्हा नवी मुंबई प्रवास, फिलिपिन्सच्या नागरिकाचा मुंबईत मृत्यू, धाकधूक वाढली

Corona समूह संसर्ग : कोरोना प्रसाराचा तिसरा टप्पा नेमका काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.