एक बाप म्हणून माफी मागतो, आईने काय शिक्षण दिलं माहिती नाही, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही : गायक कुमार सानू

जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती.

एक बाप म्हणून माफी मागतो, आईने काय शिक्षण दिलं माहिती नाही, मुलगा 27 वर्षांपासून माझ्यासोबत नाही : गायक कुमार सानू
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 5:55 PM

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात स्पर्धक असणाऱ्या जान कुमार सानूच्या (Jaan Sanu) वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ‘मराठीची चीड येते’, या त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याच्यासह कलर्स वाहिनीवरदेखील (Colors TV) टीका सुरू झाली होती. यानंतर कलर्स वाहिनेने जाहीर माफी मागत, जान सानूच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर आता खुद्द जानच्या वडिलांनी म्हणजेच प्रसिद्ध गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांनी समस्त महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे.(Kumar Sanu Apologies for Jaan Sanu’s Controversial statement)

एका व्हिडीओद्वारे कुमार सानूने जानच्या कृत्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली आहे. ‘गेल्या 40 वर्षात या ‘मुंबादेवी’च्या आशीर्वादाने मी इतका मोठा झालो. या भूमीने मला नाव आणि प्रसिद्धी दिली. अशा या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अशी कुठलीच गोष्ट माझ्या मनातसुद्धा येणार नाही. मला भारतातील सगळ्या भाषांबद्दल प्रचंड आदर आहे. माझा मुलगा जान गेली 27 वर्ष माझ्यासोबत राहत नाही. त्याच्या आईने त्याला काय शिकवण दिली, कोणाशी कसे बोलावे हे शिकवले का?, या सगळ्या गोष्टींचा अंदाज मला नाही. परंतु, आता जानचा वडील या नात्याने मी सगळ्यांची माफी मागतो’, असे म्हणत त्यांनी सगळ्यांची माफी मागितली आहे.(Kumar Sanu Apologies for Jaan Sanu’s Controversial statement)

जानच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद

जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान सानूला ‘थोबडवणार’ म्हणत धमकीवजा इशारा दिला होता.

त्यानंतर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा सज्जड दम दिल्यानंतर कलर्स वाहिनीने तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली होती. या जाहीर माफीनाम्यात यापुढे असे होणार नाही, असे वचन देखील दिले होते. (Kumar Sanu Apologies for Jaan Sanu’s Controversial statement)

जान कुमार सानूला ‘बिग बॉस’मधून हाकला, अन्यथा कार्यक्रम चालू देणार नाही! : प्रताप सरनाईक

जान सानूने मागितली माफी

बुधवारी (28 ऑक्टोबर) रात्री ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान याने सुद्धा या संदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जान कुमार सानूला योग्य ती समझ दिली होती. त्यानंतर बुधवारच्या भागात जान सानूने याबाबत चॅनलवर येऊन जाहीर माफी मागितली.

एका व्हिडीओच्या माध्यमातून जान कुमार सानू याचे वडील व आघाडीचे गायक कुमार सानू यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व आमदार प्रताप सरनाईक यांची जाहीर माफ मागितली आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी महाराष्ट्र, बाळासाहेब यांच्याशी त्यांच्या असलेल्या संबंधांना उजाळा देत, आम्ही जे काही आहोत ते या महाराष्ट्र आणि मराठी मातीमुळे आहोत, अशी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मुलाकडून झालेल्या मराठी भाषेच्या अवमानाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.( Kumar Sanu Apologies for Jaan Sanu’s Controversial statement)

हेही वाचा : ‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

काय आहे प्रकरण?

‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 14) खेळादरम्यान झालेल्या वादात जान कुमार सानूने निक्की तंबोलीशी बोलताना मराठी भाषेची चीड येत असल्याचे म्हटले होते. ‘बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे. राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसत असते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला होता.

(Kumar Sanu Apologies for Jaan Sanu’s Controversial statement)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.