राज्य निवडणूक आयोगाचा जोश हाय, यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 850 कोटीचा खर्च अपेक्षित
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Poll dates Maharashtra) तारखा जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (State Election Commission) पत्रकार परिषद घेऊन आपली यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं.
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Poll dates Maharashtra) तारखा जाहीर केल्यानंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने (State Election Commission) पत्रकार परिषद घेऊन आपली यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे, राज्यात शांततेने निवडणूक पार पडावी यासाठी तयारी पूर्ण झाली असून 31 ऑगस्टपर्यंत आलेल्या यादीनुसार 8 कोटींवर मतदारांची संख्या पोहोचली, अशी माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी सांगितलं.
साडे आठशे कोटी रुपयांचा खर्च या निवडणुकीत अपेक्षित आहे, असं बलदेव सिंह यांनी सांगितलं. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्यांची माहिती वेबसाईट आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी लागणार आहे.
दिव्यांग मतदारासाठी विशेष सुविधा – ५००० मतदान केंद्र आता तळमजल्यावर आणण्यात आले आहेत. 2009 मध्ये ५० टक्के आणि २०१४ मध्ये ६०.३२ टक्के मतदान झाले होते. ५३२३ मतदान केंद्रांची यावेळी वाढ झाली आहे. आधी ९१ हजार ३२९ मतदान केंद्र होती आता ९६ हजार ३४३ मतदान केंद्र आहेत, असं बलदेव सिंह यांनी सांगितलं.
ईव्हीएम आणि व्हीवीपॅट यावेळी देखील वापर होणार आहे. सी गिल अॅप यावेळीही वापरला जाणारा आहे. नागरिकांना माहितीसाठी १९५० हा नंबर आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.
महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा
- अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
- नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
- अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
- अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
- मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
- मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019
संबंधित बातम्या
LIVE UPDATE | महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजणी
Maharashtra Assembly Election | आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?