Rain Update | पुढचे पाच दिवस जोरदार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात पावसाबाबत अंदाज काय?
राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे : यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनमध्ये काहीकाळ (Maharashtra Rain Update) खंड पडला. मात्र, थोड्याशा खंडानंतर अरबी समुद्रात मान्सूनला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे (Maharashtra Rain Update).
पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज शुक्रवारी (3 जुलै) आणि शनिवारी (4 जुलै) अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.
मुंबईत पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा
मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. आज शुक्रवारी आणि शनिवारी काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे. 6 आणि 7 तारखेनंतर पावसाचं प्रमाण कमी होईल.
ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तास जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला.
त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात अनेक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडेल. 5 तारखेला अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर पुढील 48 तासात नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे (Maharashtra Rain Update).
VIDEO : Mumbai Rain | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटाhttps://t.co/EDGVBTSZgK
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2020
पुण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस
पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र, घाट माथ्यावर पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा आहे. तर पाच, सहा आणि सात तारखेला मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. मात्र, 5 ते 7 तारखेला घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद आणि लातूरला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला. 4 ते 7 तारखेपर्यंत चार दिवस सर्वदूर पाऊस पडेल. मात्र, 6 आणि 7 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला (Maharashtra Rain Update).
संबंधित बातम्या :
Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा