Malegaon Corona | मालेगावात नवे कोरोनाग्रस्त घटले, कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ
पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत गेली.
मालेगाव : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मालेगावात कोरोनाचा (Malegaon Corona Cases Update) शिरकाव झाला आणि बघता बघता संपूर्ण शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत गेला रोज येणाऱ्या अहवालात मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य मंत्र्यांसह, कृषी मंत्री प्रशासन यंत्रणा उपाययोजना करत होत्या, त्यामुळे वाढत असलेली रुग्ण संख्या गेल्या काही दिवसात आटोक्यात (Malegaon Corona Cases Update) येत असल्याचे चित्र दिसत आहे.
7 एप्रिल पर्यंत मालेगाव ‘कोरोनामुक्त’ होता. पण 8 तारखेला आलेल्या अहवालात पहिल्यांदाच 5 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आणि प्रशासनाची चिंता वाढली. त्यानंतर कोरोना मालेगावात कहरच केला. रोज येणाऱ्या अहवालात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आणि काही दिवसातच हा आकडा 600 च्या पार गेला. सध्या मालेगावात 617 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. पण, गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या ही वाढल्याने आरोग्य यंत्रणे सह प्रशासनला काहीसा (Malegaon Corona Cases Update) दिलासा मिळाला आहे.
Solapur Corona Update | सोलापुरात 50 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, प्रतिबंधित क्षेत्रातही घटhttps://t.co/XrlJ9Ox0df #solapur #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
गेल्या 9 दिवसात प्राप्त अहवाल आणि त्यात मिळालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आडकेवारी
दिनांक | प्राप्त अहवाल | पॉझिटिव्ह रुग्ण |
---|---|---|
8 मे | 420 | 25 |
9 मे | 255 | 56 |
10 मे | 193 | 21 |
11 मे | 216 | 13 |
12 मे | 183 | 05 |
13 मे | 228 | 07 |
14 मे | 86 | 12 |
15 मे | 120 | 09 |
16 मे | 195 10 | 10 |
पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. कालपर्यंत मालेगावमध्ये 428 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
दिनांक | डिस्चार्ज रुग्ण संख्या |
---|---|
8 मे | 41 |
10 मे | 51 |
12 मे | 205 |
13 मे | 245 |
14 मे | 377 |
16 मे | 428 |
एकंदरीतच मालेगावची अशीच परिस्थिती राहिल्यास कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला मालेगाव हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार (Malegaon Corona Cases Update) नाही.
संबंधित बातम्या :