अर्वाच्च ओरडणारे आता कुठे आहेत?, हाथरस प्रकरणावरुन राज ठाकरे कडाडले
"महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?", असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. (MNS Raj Thackeray Facebook Post On Hathras Gang Rape)
मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून देशात संताप व्यक्त केला जातोय. तसंच याप्रकरणात यूपी पोलिसांच्या वागणुकीवर संशय उपस्थित केला जातोय. अशातच या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच यूपी पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. (MNS Raj Thackeray Facebook Post On Hathras Gang Rape )
“उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे. पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”, असा रोकडा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या वर्तणुकीवर देखील राज ठाकरे यांनी टीका केली. “त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?”, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?”, असं म्हणत अर्णब गोस्वामीचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय. तसंच माध्यमांच्या भूमीकेवर देखील राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये, असंही राज म्हणाले.
“हाथरसमधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे !”, अशी परखड भूमिका घेत राज ठाकरे यांनी योगी सरकारला खडे बोल सुनावलेत.
राज ठाकरे म्हणाले, “उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये. हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे !”
#HathrasHorror #संतापजनक pic.twitter.com/qfPZtOlIBH
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2020
(MNS Raj Thackeray Facebook Post On Hathras Gang Rape )
संबंधित बातम्या
यूपी पोलिसांकडून लोकशाही मूल्ये पायदळी, राहुल गांधींसोबतच्या धक्काबुक्कीनंतर शरद पवारांचा संताप
यूपी पोलिसांकडून राहुल गांधींना अटक, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या गाड्यांवर चढले
Hathras Case | यूपी पोलिसांकडून राहुल गांधींना अटक, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
Hathras Case | यूपी पोलिसांकडून राहुल-प्रियांका गांधींची सुटका