मुंबई मनपा आयुक्त नागपुरात, कोरोना रोखण्यासाठी इक्बाल चहल यांची खास रणनीती

मुंबईत आम्ही सर्व्हेलान्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या. या पद्धतीने काम सुरु आहे.

मुंबई मनपा आयुक्त नागपुरात, कोरोना रोखण्यासाठी इक्बाल चहल यांची खास रणनीती
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 8:27 PM

नागपूर : “मुंबईत केलं त्याप्रमाणे नागपुरात काम करण्याची गरज आहे”, असं मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले (Mumbai Commissioner Iqbal Chahal On Nagpur Tour). ते  आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

“कोरोनाचा लढा किती दिवस चालणार हे सांगणे कठीण आहे. आकडा शून्यावर कधी येईल हे सांगणे कठीण आहे. मेडिकलचे चार स्तंभ आपल्याला मजबूत करायचे आहेत. ते म्हणजे टेस्ट करणे, कॉटेक्ट ट्रेसिंग करणे, क्वॉरंटाईन करणे आणि ट्रीटमेंट करणे हे महत्त्वाचं आहे”, असं ते म्हणाले.

“मुंबईत आम्ही सर्व्हेलान्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या. या पद्धतीने काम सुरु आहे. तेच सगळं नागपुरात करण्याची गरज आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

“प्रत्येक शहरात वेगवेगळी कारणं आहेत. रुग्णाला लगेच रिपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरु झाली पाहिजे. उशिरा रिपोर्ट मिळाले, तर ट्रीटमेंट उशिरा होते आणि त्यामुळे मृत्यू वाढतो “.

“सुरुवातीला मुंबईमध्ये सुद्धा मृत्यूदर जास्त होता. तो आता कमी झाला आहे. बेड उपलब्ध करुन देण्यासाठी उपाय करणे, रुग्णाला बेड मिळणे आवश्यक आहे. टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील”, असं इक्बाल चहल यावेळी म्हणाले.

Mumbai Commissioner Iqbal Chahal On Nagpur Tour

संबंधित बातम्या :

Special Report | पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम?

नागपूर आयुक्तांचा कामाचा धडाका, कोव्हिड सेंटरला अचानक भेट, नंतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.