Nitin Raut Profile : नितीन राऊत यांचा परिचय

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून ऐनवेळी आलेलं नाव म्हणजे नितीन राऊत (Nitin Raut Profile) होय.

Nitin Raut Profile : नितीन राऊत यांचा परिचय
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 9:45 PM

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसकडून ऐनवेळी आलेलं नाव म्हणजे नितीन राऊत (Nitin Raut Profile) होय. नितीन राऊत (Nitin Raut Profile) हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील धडाडीचे नेते आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. राऊत 2014 पर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार हमी आणि जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.

1999, 2004 आणि 2009 मधील विधानसभा निवडणुकीत ते नागपूर उत्तर मतदारसंघातून आमदारपदी निवडून गेले होते. त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय, गृह, जेल, राज्य कामगार आणि उत्पादन शुल्क विभागाचं कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर नितीन राऊत यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब नियोजनावरील विचार आणि आधुनिक भारताशी त्याचा संबंध’ यासारख्या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत.

नितीन राऊत यांनी ‘संकल्प’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले असून मागास वर्गातील जनतेला मदत करण्यासाठी ते काम करतात.

नितीन राऊत

नाव : डॉ. नितीन काशिनाथ राऊत जन्म : 9 ऑक्टोबर 1952. जन्म ठिकाण : नागपूर, जिल्हा नागपूर. शिक्षण : एम ए., एफ.बी.एम., सी.पी.एल., एम.एफ.ए. (नाट्य) पीएच.डी. ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी सुमेधा अपत्ये : एकूण 2 (एक मुलगा व एक मुलगी) व्यवसाय : उद्योग/व्यापार. पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) मतदारसंघ : 57-नागपूर (उत्तर)

राजकीय कारकिर्द :

  • 1999-2004, 2004-2009, 2009-2014 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
  • विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे सदस्य
  • आरक्षण अधिनियमासाठी गठित केलेल्या समितीचे सदस्य
  • वनोत्पादनाच्या चोरी संबंधीच्या संयुक्त समितीचे सदस्य
  • विधान मंडळाच्या रोजगार स्वयंरोजगार समितीचे सदस्य
  • डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2009 गृह, तुरुंग,
  • राज्य उत्पादन शुल्क व कामगार खात्याचे राज्यमंत्री,
  • ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड

इतर पदे :

  • अध्यक्ष, पिपल्स प्रोग्रेसिव्ह सोसायटी, नागपूर,
  • आजीव सदस्य, नागपूर फ्लाईंग क्लब लि.;
  • सदस्य, डी. यु. डी. ए.;
  • विश्वस्त, नागपूर सुधार प्रन्यास,
  • सदस्य, गृह विभाग कामकाज स्थायी समिती;
  • अध्यक्ष, राज्य परिवहन सल्लागार समिती,
  • अध्यक्ष, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सल्लागार समिती
  • अध्यक्ष, अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती शिकाऊ विमानचालक संघटना
  • सल्लागार, महाराष्ट्र राज्य वनपाल व वनरक्षक संघटना व वेस्टर्न कोलफिल्डस् लि. अनुसूचित जाती/जामाती कर्मचारी कल्याण संघटना

इतर कामे

  • पददलितांच्या उद्धारासाठी संकल्प संस्था सुरु करुन या संस्थेमार्फत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम
  • जातीय दंगली, पूरग्रस्त आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदत
  • दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी नागपूर येथे दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी सक्रिय सहाय्य
  • 1987 मोफत अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करुन लाखो भाविकांना अन्नदान, पिण्याच्या पाण्याची मोफत सोय, प्रसाधन गृहे, स्नानगृहे उभी केली, 2.5 लाख लोकांच्या विश्रांतीसाठी मंडपाची सोय केली;
  • मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन;
  • पर्यावरण, दारुबंदी, व्यसनमुक्ती, व्यवसायिक शिक्षण, युवकांना मार्गदर्शन
  • महिला आणि बालकल्याण, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी मोफत प्रदर्शन
  • जनजागृती शिबिरांचे आयोजन
  • 1988 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेसाठी आयोजन
  • 1989 राष्ट्रीय एकात्मतेसाठी नागपूर ते रायपूर भीमज्योत यात्रेचे आयोजन
  • 1991 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 व्या जयंतीनिमित्त नागपूर येथील कस्तूरचंद पार्क येथे भव्य रॅलीचे आयोजन
  • मराठवाडा नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग
  • नागपूर विद्यापीठामधील अनुसूचित जाती आणि जमाती यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न
  • महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठीच्या आंदोलनात सहभाग
  • सेवेतील सुरक्षितता व सुधारित वेतनश्रेणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न, अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायिक आणि खासगी विमानचालन अनुज्ञाप्ती तसेच शिष्यवृत्ती मिळावी यासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व
  • 1989 चंद्रपूर येथे दलित साहित्य संमेलनात सहभाग आणि विविध विषयांवर व्याख्याने दिली
  • 1991 विदर्भ साहित्य संमेलनात सहभाग; 2002 नागपूर येथे अस्मितादर्श रजत महोत्सव आणि साहित्य संमेलनाचे आयोजन
  • 1990 नागपूर जिल्ह्यातील मकर-धोकडा येथील जातीय दंगलीतील दंगलग्रस्तांना मदत
  • 1991 मोवाड आणि नागपूर येथील पूरग्रस्तांना मदत कार्य आमि 15 दिवस अन्नदान
  • स्वतंत्र विदर्भाचे समर्थक, विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील
  • 19 एप्रिल 2000 संविधान बचाओ रॅलीचे आयोजन, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील मागासवर्गीय अनुशेष भरण्यासाठी प्रयत्न
  • भारत सरकारच्या राष्ट्रीय आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती/जमाती आयोग स्थापन्यासाठी प्रयत्न
  • 1962 मधील संसद आणि राज्य विधानसभेत, अनुसूचित जातीसाठींच्या राखीव जागांच्या संख्येइतकी वाढ करण्याची राज्य शासनाची शिफारस मिळविण्यासाठी प्रयत्न

पुरस्कार आणि सन्मान

  • मोरवाडा येथील पूरग्रस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल वनराई संस्थेमार्फत पुरस्काराने सन्मानित
  • रत्नागिरी येथे आरक्षण विधेयकासाठी सन्मानित
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.