Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. दररोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीला मागील 15 तासात ब्रेक लागला आहे (No new Corona infected patient in Maharashtra).
मुंबई : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. दररोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीला मागील 15 तासात ब्रेक लागला आहे (No new Corona infected patient in Maharashtra). मागील 15 तासात राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची तब्येत स्थिर असल्याचंही नमूद केलं.
राजेश टोपे म्हणाले, “राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही. सर्व 39 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. आज कॅबिनेट बैठकही आहे. त्यातही कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. आपण अनेक खबरादारीचे उपाय केले आहेत. काल (16 मार्च) शाळा, कॉलेज बंद करण्यासोबतच परीक्षा पुढे ढकलण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हा करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गाभा आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात न येता अधिकाधिक अंतर कसं ठेवता येईल यावर सर्वांनी लक्ष द्यावं. ज्या उपाययोजना आणि खबरदारी आपण घेतल्या आहेत. त्यांची कठोर अंमलबजावणी होणं अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रशासनाला केलेल्या उपाययोजनांच्या कठोर अंमलबजावणीबाबत आदेश दिले आहेत.”
उद्योगजगताकडून मदतीसाठी राज्य सरकारचे प्रयत्न
उद्योगजगतातून कोरोना नियंत्रणासाठी काही मदत मिळू शकते का यावर काम सुरु आहे. त्यासाठी उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांसोबत आज बैठक होत आहे. उद्योजकांना राज्य सरकारला मदत करण्याचं आवाहन केलं जाणार आहे. यात कॉर्पोरेट ऑफिसमधील कामं कशी कमीतकमी ठेवता येतील यासाठी प्रयत्न करण्याबाबत विचारणा केली जाईल. अगदी काम बंद करण्याच्या पर्यायावर देखील विचार केला जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) राज्य सरकारला देण्याबाबतही उद्योगपतींशी चर्चा केली जाईल. ज्या ज्या स्वरुपात उद्योग जगत मदत करु शकतं त्या त्या स्वरुपातील मदत मिळण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. यासाठी सह्याद्री अतिथीगृहाला याबाबत बैठक होईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण
Maharashtra Corona: महाराष्ट्राला किंचित दिलासा, 15 तासात एकही नवा रुग्ण नाही : राजेश टोपे
पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार
Corona Updates: शिर्डीचे साईबाबा मंदिर आजपासून बंद
7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल
CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार
No new Corona infected patient in Maharashtra