Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यातबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. (Pravin Darekar Criticized Thackeray Goverment Over Maratha Reservation)

Maratha Reservation : स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकार गंभीर नाही : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 6:46 PM

मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यातबाबत राज्य सरकार गंभीर नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणावर असलेली स्थगिती उठवण्यातबाबत राज्य सरकार गंभीर आणि तत्पर नसल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. (Pravin Darekar Criticized Thackeray Goverment Over Maratha Reservation)

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले.  मराठा आरक्षणाच्या संदर्भातील स्थगिती उठवण्यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल केल्यानंतर ती मेन्शन करणे आवश्यक असते. मात्र अजूनपर्यंत कोर्टात मेन्शन करण्याबाबत राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नसल्याचे दरेकर यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या प्रक्रियेत गती येण्यासाठी राज्य सरकारने यात बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाला गांभीर्याने घेतलेले नाही, असं टीकास्त्र प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारपवर डागलं.

अजूनही हे मॅटर कोर्टात मेन्शन झालेले नाही. त्यामुळे हा मॅटर जोपर्यंत मेन्शन होत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकत नसल्याचे दरेकर म्हणाले. सरकारने या विषयात अधिक जोरदारपणे काम करायला पाहिजे होतं मात्र राज्य सरकार धीम्या गतीने काम करतेय. त्यावरून राज्य सरकार या विषयात अजिबात गंभीर नाही हे स्पष्ट होते, असं दरेकर म्हणाले.

मराठा आंदोलन जर थांबवायचे असेल आणि समाजाला विश्वास द्यायचा असेल तर याचिका न्यायालयात त्वरित मेन्शन होणे गरजेचे आहे, असा सल्ला दरेकर यांनी राज्य सरकारला दिला.

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची महत्त्वाची बैठक, संभाजीराजेंची प्रमुख उपस्थिती

दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आज या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व आणि आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजी महाराज यांनी करावं असा ठराव झाला. पण संभाजीराजेंनी नेतृत्वाची करण्याची मागणी नम्रपणे नाकारत मी या लढाईत अखेरपर्यंत मराठा समाजबांधवांच्या पाठिशी उभा राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही, गोळी असो की तलवार, पहिला वार माझ्यावर: संभाजीराजे

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, अशी रोखठोक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. राज्यसभेत मराठा समाजाचे नेते बोलत नव्हते. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ दे. गोळीचा होऊ दे की तलवारीचा होऊ दे. संभाजी छत्रपती ही मोहीम घ्या, असं सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून मी जाईल, असं संभाजीराजे म्हणाले.

संबंधित बातम्या

Pravin Darekar | “जुलमी दबावाला मराठा समाज घाबरणार नाही” – प्रवीण दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

Pravin Darekar | केवळ ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीस टार्गेटवर : प्रवीण दरेकर

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.