पुण्यातील तुळशीबाग, महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु, सम-विषम नियम लागू
सम तारखेला एका बाजूची आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून 50% दुकाने सुरु होणार आहेत.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट (Pune Tulsi Baug To Reopen) आणि महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु होणार आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील सर्व मंडई सुरु होणार आहेत. सम तारखेला एका बाजूची आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून 50% दुकाने सुरु होणार आहेत. कोरोनाव्हायरस पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना (Pune Tulsi Baug To Reopen) राबवण्यात येणार आहे.
तुळशीबाग मार्केटमध्ये 318 दुकानं आणि 376 पथारी व्यवसायिक आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तुळशीबागेची पाहणी केली.
प्रतिबंधित क्षेत्रा बाहेर बाजारपेठा, दुकानं सुरु झाली होती. त्यामुळे तुळशीबाग कधी सुरु होणार, याची याबाबत महिलांना आणि व्यवसायिकांना उत्सुकता होती. तुळशीबागेतील बाजारपेठ सुरु व्हावी, यासाठी व्यापारी संघटनेने प्रस्ताव सादर केला होता. प्रशासनाने मान्यता दिल्याने आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तुळशीबागेत ग्राहकांची सुरक्षितता आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.
पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली होणार, ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदीhttps://t.co/S1xk0jW9Ra #MissionBeginAgain #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2020
पुण्यात कोरोनाचे 6,529 रुग्ण
पुण्यात दिवसभरात 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मनपा हद्दीत आतापर्यंत 320 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 57 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली. पुण्यात सध्या 6 हजार 529 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 168 रुग्ण डिस्चार्ज झाल्याने आतापर्यंत 3,950 रुग्ण बरे झाले.
Pune Tulsi Baug To Reopen
संबंधित बातम्या :
कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी जामीन द्या, मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरचा अर्ज, कोर्टाकडून मंजुरी
दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय‘
Pune Corona | जनता वसाहतीत तीन दिवसात 22 कोरोना रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार पार, चौथ्या लॉकडाऊनची शिथीलता कोरोनाच्या पथ्यावर!