‘हिंदू सणांवर बंदी हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोगाम असेल, पण ईश्वराने त्यांना सद्बुद्धी दिली’
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी बंद ठेवलेली धार्मिक स्थळे तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी पुन्हा खुली झाली आहेत. | BJP mla Ravindra Chavan
डोंबिवली: हिंदू सणांवर बंदी घालणे हा महाविकासाघाडीचा कॉमन मिनिमम पोग्राम असेल. पण ईश्वराने त्यांनी मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी दिली, अशी खोचक टीका भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर सोमवारपासून राज्यातील मंदिरे खुली झाली आहे. (BJP mla Ravindra Chavan take a dig at Thackeray government)
या पार्श्वभूमीवर आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज भाजप कार्यकर्त्यांसह डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराबाहेर भाजप आमदार रवींद्र चव्हाण माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी नृत्य सादर करीत फेर धरला आणि आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारला टोला लगावला. मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बहुधा हिंदू सणांवर बंदी घालणे, हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असावा. मात्र, ईश्वराने सरकारला सद्बुद्धी दिली आणि त्यांनी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला, अशी टिप्पणी रवींद्र चव्हाण यांनी केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी बंद ठेवलेली धार्मिक स्थळे तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी पुन्हा खुली झाली आहेत. राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आजच्या मंगल दिनी बहुसंख्य मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सातत्याने पाठपुरावा केला होता. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे राज्य सरकार मंदिरे उघडण्यास तयार नव्हते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मुंबईसह राज्यभरात मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली होती. अखेर आजपासून मंदिरे खुली झाल्याने भाजपच्या नेत्यांकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
रोहित पवार ग्रामदैवत गोदड महाराजांच्या दर्शनाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी गोदड महाराजांचे (Godad Maharaj) दर्शन घेतले. जनतेवरील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रोहित पवारांनी ग्रामदेवतेला साकडे घातले.
संबंधित बातम्या:
‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी मंदिर संस्थानकडून मोबाईल अॅप तयार, ‘एक खिडकी योजने’चीही सोय
(BJP mla Ravindra Chavan take a dig at Thackeray government)