राऊतांनी विचारलं रामदास आठवले कुठेत?, आठवले मैदानात उतरुन उत्तर देणार

हाथरस प्रकरणावरून रामदास आठवले कुठे आहेत असं विचारणाऱ्या संजय राऊत यांना प्रत्यक्ष मैदानावर उतरून आठवले उत्तर देणार आहेत. (Ramdas Athawales reply to Sanjay raut on his comment on Hathras Rape)

राऊतांनी विचारलं रामदास आठवले कुठेत?, आठवले मैदानात उतरुन उत्तर देणार
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 9:03 PM

मुंबई : हाथरस प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधत नटीसाठी भांडणारे आठवले कुठे आहेत?, अशी विचारणा केली होती. त्यानंतर आता रामदास आठवले हाथरसमधील पीडित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्याविरोधात 1 ऑक्टोबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. प्रत्यक्ष मैदानावर उतरून आठवले राऊतां उत्तर देणार आहेत. (Ramdas Athawales reply to Sanjay raut on his comment on Hathras Rape)

हाथरसमधील पीडित दलित मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधात 1 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानवर रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी ट्विट करून दिली आहे. तसंच 2 ऑक्टोबरला आठवले पीडित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.

“पीडित मुलीच्या न्यायाच्या मागणीसाठी 3 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची मी भेट घेणार आहे”, असं आठवलेंनी सांगितलं. “हाथरसमधील दलित युवतीच्या अत्याचार आणि हत्येच्या अमानुष गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसंच आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी ही आमची मागणी” असल्याचं आठवलेंनी सांगितलं.

“हाथरस बलात्कार घटनेप्रकरणी मला कुठेही ट्वीटवर किंवा मीडियात आंदोलन छेडलेलं दिसत नाही. रामदास आठवले कुठे आहेत. अभिनेत्रीच्या घरी जाऊन तिला सुरक्षा देत होते, त्यांचे कार्यकर्ते स्वागतासाठी गेले होते. काल राजभवनात गेले होते. या देशातील एकेकाळी लढणारी खंबीर अनुसूचित जमातीतील चळवळ आज निस्तेज होताना दिसत आहे”, अशी टीका हाथरस प्रकरणावरून राऊतांनी आठवले यांच्यावर केली होती.

जर कोणत्या अभिनेत्रीच्या घराची कौल जरी उडवली तरी सुद्धा अन्याय, अत्याचार असं म्हटलं जातं. त्याप्रकरणी आवाज उठवला जातो. मग आता का नाही, असा सवाल देखील राऊत यांनी आठवलेंना विचारला होता. (Ramdas Athawales reply to Sanjay raut on his comment on Hathras Rape)

संबंधित बातम्या

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

UP GANGRAPE CASE | स्मृती इराणी गप्प का? नेटकऱ्यांची इराणींवर टीकेची झोड, राजीनामा देण्याची मागणी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.