Bigg Boss Marathi | रुपाली भोसले ‘बिग बॉस’च्या घरातून Eliminate

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून अभिनेत्री रुपाली भोसले एलिमिनेट झाली आहे. रुपालीने जाताना हीना पांचाळला पुढील आठवड्यासाठी सुरक्षित केलं

Bigg Boss Marathi | रुपाली भोसले 'बिग बॉस'च्या घरातून Eliminate
Follow us
| Updated on: Aug 04, 2019 | 9:53 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi Season 2) च्या घरात सत्तर दिवस घालवल्यानंतर स्पर्धकांमधील चुरस वाढली आहे. अशातच बिग बॉसच्या घरातून एक धक्कादायक एलिमिनेशन झालं आहे. विजेतेपदाची दावेदार मानली जाणारी सदस्य, अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) स्पर्धेतून बाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘बिग बॉस’च्या घरात उरलेल्या दहा स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी गाठण्यासाठी चढाओढ सुरु आहे. ग्रँड फिनालेमध्ये किती स्पर्धकांचा समावेश होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही सहा स्पर्धकांचा समावेश महाअंतिम फेरीमध्ये होईल, अशी शक्यता प्रेक्षक वर्तवत आहेत. बिग बॉसच्या घरात विजेतेपदाची दावेदार समजली जाणारी रुपाली एलिमिनेट झाल्याने सहस्पर्धकांसह प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे.

महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगणाऱ्या ‘वीकेंडचा डाव’मधील रविवारच्या भागात हे एलिमिनेशन पाहायला मिळणार आहे. यंदाच्या आठवड्यात वीणा जगताप, हीना पांचाळ, आरोह वेलणकर आणि रुपाली भोसले हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. अभिजीत आणि नेहा यांच्याकडे सदस्यांना सेफ करण्याचा अधिकार होता. त्यावेळी नॉमिनेशन टास्कमध्ये अभिजीतने किशोरी आणि शिव, तर नेहाने शिवानीला वाचवलं.

वाईल्ड कार्ड स्पर्धक असलेल्या आरोहला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र रुपालीचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपल्याचं समोर आलं आहे.

हीना पांचाळ सेफ

घराबाहेर पडल्यानंतर महेश मांजरेकर यांनी रुपालीला एका सदस्याला सेफ करण्याची संधी दिली. सुरुवातीला रुपालीची किशोरी आणि वीणाशी जवळीक होती. गेल्या दोन आठवड्यांपासून शिवानी, नेहा यांच्यासोबत तिची खास गट्टी जमली होती. शिव आणि अभिजीत केळकरसोबतही तिची मैत्री होती. मात्र या सर्वांना सोडून रुपालीने थेट हीनाला सेफ केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

वीणाची भेट टाळली

बिग बॉसच्या घराचा निरोप घेताना रुपालीने वीणाची भेट घेणं टाळल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर किशोरी, वीणा, पराग आणि रुपाली असा KVRP ग्रुप बिग बॉसच्या घरात सुरुवातीला पाहायला मिळत होता. मात्र चौघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाल्याने ग्रुपच्या ठिकऱ्या उडाल्या. वीणाची शिवशी जवळीक झाली. नंतर ते वैशाली, अभिजीत यांना जॉईन झाले.

शिव-वीणा, हीना, बिचुकलेंची शाळा

शनिवारच्या भागात महेश मांजरेकर यांनी शिव-वीणा, हीना, अभिजीत बिचुकलेंची शाळा घेतली. बाथरुम साफ करण्यास बिचुकलेंनी नकार देत आरोहला शिवीगाळ केल्याबद्दल मांजरेकरांनी खडसावलं. तर लॉयल्टीवरुन वीणाचे कान धरले. हीनाला पुन्हा एकदा बडबड कमी करण्याचा सल्ला महेश मांजेरकर यांनी दिला.

फॅमिली वीक

गेल्या आठवड्यात स्पर्धकांचे कुटुंबीय घरात भेट घेण्यासाठी आले होते. रुपालीचा भाऊ संकेत आणि तिची लाडकी दक्षू भेटायला आले होते. यावेळी संकेतने तिला खंबीरपणे खेळण्याचा सल्लाही दिला होता.

अभिजीत बिचुकले यांची मुलगी, मुलगा, पत्नी आणि आई घरात आल्या होत्या. सर्व सदस्यांनी बिचुकले कुटुंबाचं उत्साहात स्वागत केलं. वीणाच्या आईने शिवानीची खरडपट्टी काढली, तर हीनाच्या आईनेही वीणा-शिवानी यांना जाब विचारला. किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबीनेही आपल्या आईला टार्गेट न करण्याचं आवाहन सर्वांना केलं. शिवची आई आणि बहीण यांनीही धमाल उडवली. आरोहची पत्नी, नेहाचा नवरा नचिकेत, अभिजीत केळकरची पत्नी, शिवानीचे वडीलही घरात आले होते.

अंतिम फेरीकडे वाटचाल सुरु असताना एकामागून एक धक्कादायक एलिमिनेशन्स होत आहेत. सुरेखा पुणेकर, वैशाली म्हाडे, माधव देवचके यांच्यानंतर आता रुपाली भोसलेचा नंबर लागला.

बिग बॉसच्या घरात आता वीणा जगताप, शिव ठाकरे, अभिजीत केळकर, किशोरी शहाणे-वीज, नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, हीना पांचाळ आणि आरोह वेलणकर हे आठ सदस्य आहेत. अभिजीत बिचुकले यांना पुढील आदेशापर्यंत पाहुण्याची भूमिका देण्यात आली आहे. त्यांना अद्याप बिग बॉसकडून सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.