ना उदयनराजे, ना संभाजीराजे, मेटेंच्या मराठा विचार मंथन बैठकीला प्रमुख नेत्यांची दांडी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आमदार विनायक मेटेंनी बोलावलेल्या बैठकीला खा. छत्रपती संभाजीराजे तसंच खासदार उदयनराजेंनी दांडी मारली. (SambhajiRaje and Udanayaraje absent Meeting Orgnized By Vinayak Mete Over Maratha reservation)

ना उदयनराजे, ना संभाजीराजे, मेटेंच्या मराठा विचार मंथन बैठकीला प्रमुख नेत्यांची दांडी
Follow us
| Updated on: Oct 03, 2020 | 5:10 PM

पुणे : आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मराठा विचार मंथन बैठक पार पडली. या बैठकीला खा. छत्रपती संभाजीराजे तसंच खासदार उदयनराजे भोसले यांना निमंत्रण होतं. मात्र मेटेंनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही राजेंनी दांडी मारली. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून मेटेंना बैठक उरकावी लागली. (SambhajiRaje and Udanayaraje absent Meeting Orgnized By Vinayak Mete Over Maratha reservation)

नाशिकमधल्या छत्रपती संभाजीराजेंच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय मराठा समन्वयकांच्या बैठकीला विनायक मेटे उपस्थित राहिले नव्हते. आज मेटेंच्या बैठकीला ‘ही बैठक त्यांची वैयक्तिक बैठक आहे’, असं सांगून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. एकंदरितच दोन्ही राजे तसंच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्या शिवाय मेटेंची बैठक पार पडली.

“आरक्षणासह इतर मागण्यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून सगळ्यांना मी बोलावलं होतं. संभाजीराजे, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह क्रांती मोर्चा, तसंच ठोक मोर्चाच्या प्रमुख प्रतिनिधींना बोलवलं होतं. आपल्यामधले जे मतभेद आहेत त्यावर बोलू, चर्चा करू, असं सांगितलं होतं. पण दोन्ही राजे आले नाहीत”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

“मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर तसंच समाजाच्या प्रश्नावर आपण एकत्र येऊ शकत नाहीत यासारखं दुर्दैव काय असू शकतं?”, असा सवाल देखील दोन्ही राजेंच्या अनुपस्थितीनंतर मेटेंनी विचारला.

“उदयनराजे मला येतो म्हणाले होते. पण का आले नाहीत, मला माहीती नाही. त्यांनी या व्यासपीठावर आलं नाही तरी हरकत नाही पण समाजाच्या कोणत्याही व्यासपीठावर त्यांनी उपस्थिती लावावी”, अशी विनंती विनायक मेटे यांनी यावेळी केली.

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 11 ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली गेली पाहिजे, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली. तसंच जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मी शरद पवारांना करत असल्याचं”, मेटे यांनी सांगितलं.

(SambhajiRaje and Udanayaraje absent Meeting Orgnized By Vinayak Mete Over Maratha reservation)

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

Maratha Reservation | मराठा समाजाचा EWS आरक्षणाला विरोध, खासदार संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.