फेसबुकवर विदेशी तरुणाशी चॅटिंग अंगलट, महिलेला नऊ लाखांचा गंडा
फेसबुकवर लंडनच्या अनोळखी तरुणाशी मैत्री करणे एका महिलेला चांगलचं भोवलं आहे. या अनोळखी मित्राने महिलेला तब्बल नऊ लाखांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या महिलेला सुरुवातील गिफ्टचं आमिष देऊन फसवण्यात आलं आणि त्यानंतर धमकी देऊन त्यांच्याकडून हे पैसे उकळण्यात आले.
सोलापूर : फेसबुकवर लंडनच्या अनोळखी तरुणाशी मैत्री करणे एका महिलेला चांगलचं भोवलं आहे. या अनोळखी मित्राने महिलेला तब्बल नऊ लाखांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे या महिलेला सुरुवातील गिफ्टचं आमिष देऊन फसवण्यात आलं आणि त्यानंतर धमकी देऊन त्यांच्याकडून हे पैसे उकळण्यात आले. या संबंधी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून हा सर्व प्रकार बनवाबनवीचा असून महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.
सोलापुरातील 37 वर्षीय वैशाली शिंदे या शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. इतर करोडो-अब्जो लोकांप्रमाणे त्यांचंही फेसबुक या वेबसाईटवर अकाऊंट आहे.मात्र, फेसबुकवरील एका अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारणे इतंक महागात पडेल याचा वैशालीने कधी स्वप्नातही विचार केला नसेल. 7 मे रोजी वैशाली यांना फेसबुकवर लंडनच्या स्टिव्ह यूके नावाच्या व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट दिसली. वैशाली यांनी काहीही विचार न करता त्या अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यांची ही चूक त्यांना नऊ लाखाची पडली.
या अनोखळी व्यक्तीने वैशालीसोबत चॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्टिव्हने वैशाली यांना त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर मागितला आणि वैशाली तो दिला. त्यानंतर स्टिव्हने वैशाली यांच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला. त्यामध्ये तो वैशालीला एक भेटवस्तू पाठवत असल्याच सांगितलं. मात्र, वैशालीने त्यासाठी नकार दिला. त्यानंतर स्टिव्हने फोन करून वैशालीच्या यांच्या पत्त्यावर ती भेटवस्तू पाठवत असल्याचं सांगितलं.
13 मे रोजी दिल्ली एअरपोर्टवर भेटवस्तू आलेली आहे, मात्र त्यासाठी वाहतूक चार्जेस म्हणून 35 हजार भरावे लागणार आहेत, असं स्टिव्हने वैशाली यांना सांगितलं. त्याने वैशाली यांना विजया बँकेतील खाते क्रमांक दिला. वैशाली यांनी त्या खात्यात 35 हजार रुपये जमा केले. पैसे भरल्यानंतर काही तासांनी वैशाली यांना पुन्हा एक फोन आला. त्या भेटवस्तूच्या पाकिटात साठ हजार पाऊंड म्हणजेच 52 लाख 79 हजार 790 इतकी रक्कम असल्याचं सांगण्यात आलं. त्यासाठी आणखी 86 हजार रुपये लागणार असल्याचं वैशाली यांना सांगण्यात आलं. वैशाली यांनी पुन्हा कोटक बँकेच्या खात्यात 86 हजार रुपये भरले. त्यानंतर ती भेटवस्तू आपल्याला मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र, झालं काही वेगळचं.
सुरुवातील भेटवस्तूचं आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले. त्यानंतर वैशाली यांना एक फॉर्म पाठवण्यात आला, त्या फॉर्मवर आरबीआयचा लोगो असल्याने वैशाली यांनी तो फॉर्म भरुन दिला. फॉर्म भरल्यानंतर आतातरी भेटवस्तू मिळेल, अशी आशा वैशाली यांना होती. मात्र, त्यानंतर वैशाली यांना थेट धमकीचा फोन आला. युनाटेड नेशनच्या अॅण्टी टेररिस्ट डिपार्टमेंटला पाच लाख 51 हजार रुपये भरावे लागणार, असं सांगण्यात आलं. त्यामुळे वैशाली यांनी भीतीपोटी तेही पैसे भरले. त्यानंतर 29 मे रोजी एक लाख 91 हजार रुपये भरा अन्यथा तुमची माहिती अॅण्टी ड्रग आणि अॅण्टी टेररिस्ट डिपार्टमेंट भारत सरकारला कळवेल. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होईल, अशी भीती त्यांना घालण्यात आली.
कारवाईच्या भीतीने वैशाली शिंदे यांनी वेळोवेळी रक्कम भरली, तब्बल नऊ लाख 68 हजार रुपये वैशाली यांनी भरले. त्यानंतर पुन्हा कारवाईची भीती दाखवत शिंदे यांच्याकडे 16 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी मात्र वैशाली यांनी सावध भूमिका घेत आपल्या मित्रांना याबाबत कळवलं. त्यानंतर मित्रांच्या सांगण्यावरुन त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकिचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
संबंधित बातम्या :
लग्नाला नकार देणाऱ्या तरुणावर तरुणीचा अॅसिड हल्ला
उन्हाने तापलेल्या फरशीवर कपडे काढून बसवलं, चिमुकल्याचा पार्श्वभाग जळाला
भारताच्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूवर फसवणूक प्रकरणी आरोपपत्र
फेसबुकवरुन ब्युटी पार्लरवालीशी चॅटिंग, बोगस रॉ एजंटचा पर्दाफाश