Sonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने (Award) सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.

Sonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 12:22 PM

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) स्थलांतरित मजुरांसह तळागाळातील लोकांची मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. सोनू सूदच्या या कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने (Award) सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे (Sonu sood honoured by UNDP humanitarian action award).

बॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.

परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठीही सोनू ठरला देवदूत

देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेली मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली. (Sonu sood honoured by UNDP humanitarian action award)

इतक्यावरच त्याचे मदत कार्य थांबले नसून, खेडोपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत करण्यासाठीदेखील सोनू सूदने (Sonu Sood) पुढाकार घेतला आहे. गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याने शिष्यवृत्तीदेखील जाहीर केली आहे.

सन्मानानंतर सोनू सूदची प्रतिक्रिया

सोनू सूदने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘हा सन्मान (Award) माझ्यासाठी विशेष आहे. यूएनकडून दाखल घेतली जाणे खूप विशेष आहे. मी कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्या देशवासीयांसाठी जे काही करता येईल ते केले. संयुक्त राष्ट्र संघाने याची दाखल घेणे आणि याचा सन्मान करणे ही विशेष बाब आहे. संयुक्त राष्ट्र संघ (UNDP) मानवतेच्या दृष्टीने आखत असलेल्या धोरणाला माझा नेहमीच पाठिंबा असेल. यामुळे पुढे जगाला फायदा होणार आहे’, असे सोनू सूदने म्हटले आहे (Sonu sood honoured by UNDP humanitarian action award)

हॉलिवूडकरांनाही मिळालाय हा सन्मान

सोनू सूदच्या आधी एंजेलिना जोली, डेव्हिड बेकहॅम, लिओनार्डो डाय कॅप्रिओ, एम्मा वॉटसन, लियाम नीसन, केट ब्लँकेट, अँटोनियो बंडेरस, निकोल किडमॅन आणि प्रियंका चोप्रा यांच्यासारख्या कलाकारांना संयुक्त राष्ट्र संघाच्या या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सोमवारी (28 सप्टेंबर) पार पडलेल्या एका व्हर्चुअल सन्मान सोहळ्या दरम्यान सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.

(Sonu sood honoured by UNDP humanitarian action award)

संबंधित बातम्या : 

बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर

‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.