पत्नीला पणाला लावून दारुडा नवरा जुगारात हरला, मित्रांकडून गँगरेप

महाभारतातील द्रौपदीप्रमाणे उत्तर प्रदेशातील महिलेला तिच्या दारुड्या नवऱ्याने जुगारात पणाला लावलं. जुगारात पती हरल्यानंतर त्याच्या मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला

पत्नीला पणाला लावून दारुडा नवरा जुगारात हरला, मित्रांकडून गँगरेप
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 11:49 AM

लखनौ : उत्तर प्रदेशात दारुड्या नवऱ्याने जुगार खेळताना पत्नीला पणाला लावल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. जुगारात पती हरल्यानंतर त्याच्या मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्यावर दोन वेळा गँगेरप झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

महाभारतात द्यूत खेळताना पांडवांनी द्रौपदीला पणाला लावलं होतं. पांडवांच्या पराभवानंतर कौरवांनी तिचं वस्त्रहरण केल्याची नोंद पौराणिक कथांमध्ये आहे. मात्र ऐनवेळी श्रीकृष्णाने धाव घेत द्रौपदीचं लज्जारक्षण केलं होतं. उत्तर प्रदेशातील महिला मात्र याबाबत दुर्दैवी ठरली.

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात दारु आणि जुगाराच्या आहारी गेलेला संबंधित तरुण नेहमीप्रमाणे मित्रांसोबत जुगार खेळत होता. खिशातील पैसे संपल्यामुळे यावेळी त्याने थेट आपल्या पत्नीलाच पणाला लावलं. महिलेचं दुर्दैव म्हणजे तरुण जुगारात हरला. त्यानंतर त्याच्या दोघा मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

अरुण आणि अनिल या पतीच्या मित्रांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार इथवरच थांबला नाही. महिला नवऱ्यावर चिडून मामाच्या घरी राहायला गेली होती. मात्र त्याने तिची समजूत काढून माफी मागितली. त्यामुळे दाम्पत्य पुन्हा आपल्या घरी येण्यास निघालं. परंतु वाटेत पतीने कार थांबवली आणि त्यावेळी त्याच्या मित्रांनी दुसऱ्यांदा महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

महिलेने कोर्टाचं दार ठोठावल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील सर्व आरोपी पसार झाले असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.