MPSC परीक्षा आता घेणे ठाकरे सरकारचं षडयंत्र, विनायक मेटेंचा गंभीर आरोप
MPSC परीक्षा आताच घेणं हे ठाकरे सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला. (Vinayak Mete Alligation Thackeray Goverment Over MPSC Exam)
पुणे : एमएससीची परीक्षा पुढे ढकला यासाठी विद्यार्थी टाहो फोडत आहेत. मात्र सरकार परीक्षा पुढे ढकलायला तयार नाही. आताच MPSC परीक्षा घेणं हे ठाकरे सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला. (Vinayak Mete Alligation Thackeray Goverment Over MPSC Exam)
येत्या 11 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली. पुण्यात विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत मंत्रालयात बसलेलं काही लोकं हे षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
“MPSC ची परीक्षा पुढे ढकलली जावी, अशी मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. मात्र काहीही करून सरकारला ही परीक्षा घ्यायचीच आहे आणि विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचंय. परंतु आमचा अंत न पाहता सरकारने परीक्षा पुढे ढकलाव्यात नाहीतर आम्ही धरणे आंदोलन करु”, असा इशारा मेटे यांनी दिला.
“लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. मंत्रालयात बसलेलं काही लोकं हे षडयंत्र करत आहेत. सरकारला आमचं सांगणं आहे की विद्यार्थ्यांना विनाकारण रस्त्यावर आणू नका. नाहीतर होणाऱ्या परिणामांना सरकारने तयार रहावं”, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
!सरकारने 8 तारखेपर्यंत बैठक लावून यासंदर्भातला निर्णय घ्यावा. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी बोलून त्यांना कळवलं आहे. सरकारला विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय सरकारने घ्यावा”, असं मेटे म्हणाले. (Vinayak Mete Alligation Thackeray Goverment Over MPSC Exam)
संबंधित बातम्या
विनायक मेटेंच्या मराठा विचार मंथन बैठकीत 25 ठराव, सरकारला 31 ऑक्टोबरचा अल्टिमेटम
ना उदयनराजे, ना संभाजीराजे, मेटेंच्या मराठा विचार मंथन बैठकीला प्रमुख नेत्यांची दांडी
मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द
गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली