Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याच्या हालचाली : जयंत पाटील

अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर अनेक गोष्टी सुरु केल्या. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरु करण्यात आले. आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत.

15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याच्या हालचाली : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 1:58 PM

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जून-जुलैच्या दरम्यान अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यात आली. परंतु अद्याप लोक सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आलेली नाही. (we are planning to start mumbai local train on 15th of October says Jayant Patil)

अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर अनेक गोष्टी सुरु केल्या. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरु करण्यात आले. आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत.

येत्या काही दिवसात सिनेमागृहदेखील सुरु करण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आलेली नाही. याबाबत विचारले असता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, 15 ऑक्टोबरच्या आसपास मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, 15 ऑक्टोबरपर्यंत लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत शक्यता वर्तवली होती. आम्हा सर्वांचाच असा विचार आहे की, लोकल ट्रेन आता सुरु कराव्यात.

काल (रविवारी) याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्य सरकारच्या मागणीनंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल.

गोयल म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे जर आमच्याकडे प्रस्तावच आला नाही तर मुंबई लोकल सुरु करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्य सरकार आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल तेव्हाच आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ.

मुंबईसह देशभरात बसेस सुरु झाल्या आहेत. लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या व विमानेदेखील सुरु करण्यात आली आहेत. मात्र अद्याप मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता प्रत्येक मुंबईकराला मुंबई लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या 

…तरच मुंबई लोकल सुरु करु : रेल्वेमंत्री पियुष गोयल

Mumbai Local | …तरच मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरु करणार : इक्बाल चहल

Special Report | 1 नोव्हेंबरपासून मुंबई लोकल सुरु होणार? TIFRचा अहवाल काय सांगतो?

(we are planning to start mumbai local train on 15th of October says Jayant Patil)

माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.