चावट ग्रुपमधून सुटका होणार, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लवकरच!

मुंबई: व्हॉट्सअॅप युझर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपला आणावं लागणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं फीचर बनवण्याचे आदेश दिले आहेत. या फीचरमुळे कोणी  तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करणार असेल, तर आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल. […]

चावट ग्रुपमधून सुटका होणार, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर लवकरच!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई: व्हॉट्सअॅप युझर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपला आणावं लागणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं फीचर बनवण्याचे आदेश दिले आहेत. या फीचरमुळे कोणी  तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करणार असेल, तर आधी तुमची परवानगी घ्यावी लागेल.

सध्याच्या फीचरनुसार कोणीही सरसकट कोणालाही ग्रुपमध्ये विनापरवानगीने अॅड करु शकतो. त्यामुळे काहींना इच्छा नसूनही विविध ग्रुपमध्ये राहावं लागतं. ग्रुपमधून बाहेर पडणंही कधीकधी अवघड होतं. त्यामुळे नव्या फीचरमुळे युझरच्या परनवानगीशिवाय त्याला ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही.

कोणालाही विनापरवाना कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केलं जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचललं आहे.  सरकारी यंत्रणा सर्व तक्रारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पाठवत होते. त्यानंतर या मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला हे फीचर आणण्यास सांगितलं आहे.

यापूर्वी व्हॉट्सअॅपने एक फीचर आणलं होतं, त्यानुसार ग्रुप अॅडमिनकडे युझरचा नंबर सेव्ह असणं आवश्यक होतं.  तसंच जर एखाद्याने दोनवेळा ग्रुप सोडला, तर अॅडमिन त्याला पुन्हा ग्रुपमध्ये अॅड करु शकत नव्हता. मात्र हे फीचरही परिणामकारक ठरलं नाही.

मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, युझरने दोनवेळा ग्रुप सोडल्यानंतरही कोणी दुसरा अॅडमिन त्याला पुन्हा अॅड करु शकतो. काही घटनांमध्ये वेगवेगळ्या नंबरवरुन नवे व्हॉट्सअॅप ग्रुप बनवले गेले आणि युझर्सना इच्छा नसूनही त्यामध्ये अॅड केलं.

दरम्यान, व्हॉट्सअॅपने अद्याप मंत्रालयाच्या पत्राला कोणताही ‘रिप्लाय’ पाठवलेला नाही. सध्या भारतात  व्हॉट्सअॅपचे जवळपास 20 कोटी युझर्स महिन्याला कार्यरत असतात. असंख्य ग्रुपही कार्यरत आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं तर नकोशा ग्रुपमधून सुटका मिळणार आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.