122 वर्ष जगणारी महिला रोज खायची ‘या’ 3 गोष्टी
ईडन गेट यांनी जगातील सर्वात वृद्ध व्यक्तींचा अभ्यास करून तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य शोधून काढले आहे. तिच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची माहिती जाणून घेण्यासाठी संशोधकांनी 100 वर्षांहून अधिक जगलेल्या सहा लोकांवर संशोधन केले. त्यांनी निरोगी आणि दीर्घायुष्यामागील मुख्य घटकांचा अभ्यास केला. त्यात, हालचाल, सामाजिक-आर्थिक स्थिती, तणाव आणि आहार या गोष्टींचा समावेश आहे. या लेखात आहाराबाबत काय माहिती समोर आली ते आपण बघणार आहोत.
मुंबई : यूकेमधील सीबीडी कंपनी ईडन गेटने जगातील सर्वात वृद्ध लोकांचा त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य शोधण्यासाठी अभ्यास केला आहे. त्यांच्या आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी संशोधकांनी 100 वर्षांहून अधिक जगलेल्या सहा लोकांवर संशोधन केले. निरोगी आणि दीर्घायुष्यामागील (longevity) चार मुख्य घटक त्यांनी अभ्यासले आहेत. यापैकी आहाराचा (Diet) विचार करता व्यक्तीचे या घटकावर सर्वाधिक नियंत्रण असणे आवश्यक असते. विज्ञानानुसार, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माणसाला दीर्घायुष्य देऊ शकतात. उदाहरणार्थ, बदाम, बेरी किंवा मासे खाल्ल्याने शरीराला मिळणारे पोषण हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. या अभ्यासात 122 वर्षीय जीन लुईस कालमेंट (122 year old woman) यांच्या आहारावरही अभ्यास करण्यात आला. 1977 मध्ये त्यांचे निधन झाले आहे.
ऑलिव ऑईल
संशोधकांनी जीन लुईस कालमेंट यांच्या आहारातील तीन विशेष गोष्टी पाहिल्या. त्याच्या आहारातील प्रमुख एक घटक म्हणजे ऑलिव्ह ऑइल होते. ‘हेल्थलाइन’च्या अहवालानुसार ऑलिव्ह ऑइलमध्ये हेल्दी फॅट, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होतो. या तेलामध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात जे आपल्या शरीराची क्रिया सुधारण्यास मदत करीत असतात.
रेड वाइन
कालमेंट यांच्या आहाराचा दुसरा प्रमुख घटक होता, रेड वाईन. मेयो क्लिनिकच्या अहवालानुसार, रेड वाईनमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. रेड वाईनचे नियमित सेवन करण्याचा सल्ला अनेकांकडून देण्यात येत असला तरी, याचे प्रमाण व्यक्तीच्या शरीर रचनेनुसार ठरत असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच रेड वाईनचे सेवन केले पाहिजे. मात्र याचे प्रमाण जास्त झाल्यास मद्यापासून होणारे नुकसानदेखील रेड वाईनमुळे होउ शकते.
चॉकलेट
अभ्यासात, चॉकलेट खाणाऱ्यांसाठीही एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कालमेंट डाइट आणि हॉपकिन्स मेडिसिननुसार चॉकलेट खाल्ल्याने वयात वाढ होत असते. रेड वाईनप्रमाणेच चॉकलेटमध्येही हृदयासाठी आरोग्यदायी गुण असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. रक्तात चॉकलेट रक्ताभिसरण आणि मेंदूच्या कार्याला चालना देऊन कामगिरी सुधारते, त्यामुळे अनेक वेळा चॉकलेट खाण्याचाही सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो.
इतर बातम्या
वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!
Weight Loss Tips : हीच ती योग्य वेळ वजन कमी करण्याची, अशा प्रकारे उन्हाळ्यात झटपट वजन कमी करा!